आधी रस्‍त्‍यात गाड्या उभ्या केल्या, युवकाने गाड्या बाजूला घ्या म्हणताच टवाळखोरांनी लाकडी दांड्याने भररस्‍त्‍यात केली बेदम मारहाण, सिडकोतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्‍त्‍यावरच गाड्या उभ्या करून धिंगाणा घालत उभ्या तरुणांना ३४ वर्षीय युवकाने गाड्या बाजूला घ्या म्हटले. त्यावरून संतापलेल्या टवाळखोरांनी या युवकाला रस्‍त्‍यातच बेदम मारहाण केली. लाकडी दांडे, बेल्टे मारल्याने युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (२५ डिसेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास एन ११ तील स्मशानभूमीजवळील शिवा टी समोर घडली.

महेश सुभाषराव मेटे (वय ३४, रा. एन ९ श्रीकृष्णनगर टीव्ही सेंटर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते विराज इंटरप्रायजेस फायनान्स कंपनीत नोकरी करतात. गुरुवारी त्यांच्या मित्राच्या वडिलांचे निधन झाल्याने ते एन ११ तील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास अंत्यविधी करून ते मोटारसायकलीने घरी येत असताना शिवा टी समोर एक स्कुटी व स्विफ्ट कार रोडवर थांबवून दोन तरुण बोलत उभे होते. महेशने त्यांना गाडी बाजूला घ्यायला सांगितली. त्यावरून त्यांनी महेशसोबत वाद घालायला सुरुवात केली. उमेश गुंजाळ व सोबतचे तीन- चार जण कारमधून उतरले.

स्कुटीवरील दोघेही महेशकडे आले आणि त्यांनी मारहाण सुरू केली. उमेशने त्याचे मित्र बोलावून घेतले. त्यानंतर आणखी चार- पाच जण आले. उमेशने महेशचा शर्ट काढून लाकडी दांड्याने पाठीवर, पायावर, डोक्यात मारले. काही जण महेशला लाकडी दांडे, बेल्टने मारत होते. त्यामुळे महेश जखमी होऊन कोसळला. महेशचे मित्र धावून आल्याने उमेश गुंजाळ व त्याच्या १०-१२ साथीदारांनी महेशला सोडले. गंभीर जखमी महेशला मित्रांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. सिडको पोलिसांनी घाटीत जाऊन महेशचा जबाब नोंदवला. त्याआधारे उमेश गुंजाळ व त्‍याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software