EXCLUSIVE : सेक्स रॅकेटसाठी कोलकत्यावरून मोठ्या प्रमाणावर तरुणी छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणी आणल्या?; साजापुरात तिघींची सुटका, तिसगावमध्येही चौघींकडून करवून घेतला जात होता वेश्याव्यवसाय!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आपल्या हद्दीत राजरोस अनैतिक कामे सुरू असूनही वाळूज एमआयडीसी पोलिसांना खबरबात नसते, की जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रविवारी (२६ ऑक्‍टोबर) सहायक पोलीस आयुक्‍त संजय सानप यांच्या पथकाने साजापूर शिवारातील कुंटणखाना उद्‌ध्वस्त करत ३ तरुणींची सुटका केली, तर कुंटणखाना चालक-मालक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर मंगळवारी (२८ ऑक्‍टोबर) रात्री दहाला पोलीस आयुक्‍त कार्यालयातील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने तिसगाव शिवारातील वेलकम लॉजवर छापा मारून ४ तरुणींची सुटका केली आणि कुंटणखाना चालक, मालक आणि जागा मालक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन कारवायांमुळे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे नाकर्तेपणामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणावर तरुणी शहरात आणण्यात आल्या असून, त्‍यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचेही दिसून आले. दोन्ही कारवायांत मिळून आलेल्या तरुणी या एकीचा अपवाद वगळता कोलकत्याच्या आहेत. एक मध्यप्रदेशातील निघाली. यामुळे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी पाळेमुळे खोदून इतक्या मोठ्या संख्येने तरुणींना कोलकत्याहून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणून वेश्याव्यवसाय करवून कोण घेत आहेत, याचा छडा लागण्याची गरज आहे. दरम्‍यान, तिसगावच्या कारवाईतील कृष्णा प्रकाश चव्हाण (वय २५, रा. स्वस्तिक सिटी, गट नं. ९, वडगाव कोल्हाटी, ता. छत्रपती संभाजीनगर), रवी काशिनाथ पोळ (वय ४०, रा. पोळ रांजणगाव, ता. गंगापूर) यांना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, नितीन इनामे, सुरेश भिसे, समाधान पाटील यांनी आज, २९ ऑक्‍टोबरला दुपारी अटक केली.

WhatsAppImage2025-10-29at8.57.04PM
वेलकम लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या रवी पोळ आणि कृष्णा चव्हाणच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

 

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक जयश्री कुलकर्णी यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक राजेश मयेकर यांनी जयश्री कुलकर्णी यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अनिल कंकाळ, पोलीस अंमलदार राजपूत, राशनकर, महिला पोलीस अंमलदार चिंचोलकर यांना बोलावून घेतले. त्यांनी सांगितले, की एका गोपनीय बातमीदाराने माहिती दिली, की काही जण तिसगाव शिवारात धुळे-सोलापूर हायवेलगत हॉटेल ग्रँड सरोवरजवळील हॉटेल वेलकम लॉजमध्ये पत्र्याच्या खोल्यांमध्ये काही युवतींना डांबून ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत. त्यानंतर सर्वांनी मिळून छाप्याचे नियोजन केले. बनावट ग्राहक म्हणून एका युवकाला तयार केले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ३ नोटा देण्यात आल्या.

बनावट ग्राहकाला सूचना दिल्या की, हॉटेल वेलकम लॉजमध्ये बनावट ग्राहक म्हणून जायचे. त्यावेळी पोलीस वेलकम लॉजच्या थोड्या अंतरावर थांबतील. तिथे शारीरिक सुखासाठी महिलेची आवश्यकता असल्याची बोलणी करावी. दलाल व कुंटणखाना चालविणाऱ्यांनी होकार दिल्यानंतर महिलांची पाहणी करून त्यांच्याशी पैशाची बोलणी करून रक्कम ठरवावी. रक्कम ठरल्यानंतर पैसे देऊन महिलेसोबत रूममधे गेल्यानंतर तिच्यासोबत कोणतीही लगट किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करू नये. रूममधे महिलेसोबत गेल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अनिल कंकाळ यांच्या मोबाइलवर मिस कॉल करून इशारा द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या.

कारवाईसाठी पथक रवाना...
छाप्याचे नियोजन करून पोलीस पथक वेलकम लॉजकडे निघाले. तिसगाव चौफुलीकडे येत खवड्या डोंगराच्या पुढे वेलकम लॉजजवळ पथक रात्री १० च्या सुमारास आले. बनावट ग्राहकाला ठिकाणी हॉटेल ग्रॅण्ड सरोवरच्या बाजूला असलेल्या लॉजच्या पत्र्याच्या रूममध्ये पाठविण्यात आले. १० मिनिटांतच त्याचा इशारा पोलिसांना प्राप्त झाला. त्यानुसार लगेचच पोलिसांनी लॉजवर छापा मारला. पोलिसांना पाहून काउंटरवर थांबलेला व्यक्ती पत्र्याच्या मागील बाजूस मोकळ्या जागेतून पळून गेला. त्याने पळून जाताना जोरात आवाज केल्याने बनावट ग्राहक रूमबाहेर आला. ६ पत्र्याच्या रूम तिथे दिसून आल्या. यावेळी बनावट ग्राहकाने पोलिसांना सांगितले की, काउंटरवर असलेल्या व्यक्तीला वेश्यागमनासाठी महिलेची मागणी केल्यानंतर त्याने मला दोन महिला दाखवल्या. त्यातील एका महिलेची मागणी केल्यानंतर त्याने दीड हजार रुपये घेतले. एक कंडोम पाकीट देऊन त्या महिलेसोबत रूममध्ये पाठवले होते. 

तरुणी निघाल्या कोलकता, झांशीच्या...
बनावट ग्राहकासोबत असलेल्या तरुणीस पोलिसांनी नाव, गाव विचारले असता तिने नाव सांगून ती २१ वर्षांची असून, कोलकत्त्याची असल्याचे सांगितले. बाजूला असलेल्या रूमची पोलिसांनी झडती घेतली. त्या रूममध्ये १८ वर्षांची मुलगी होती. ती झाशी, मध्यप्रदेशची निघाली. तिच्यासोबतचा व्यक्ती घाणेगाव (ता. गंगापूर) येथील २४ वर्षीय तरुण निघाला. तिसऱ्या रूमची झडती घेतली असता तिथेही एक १८ वर्षांची तरुणी मिळून आली. ती पश्चिम बंगालची निघाली. तिच्यासोबत असलेला ग्राहक हा डोणगाव (ता. गंगापूर) येथील ३४ वर्षीय वाहनचालक निघाला. चौथ्या रूममध्ये २१ वर्षीय तरुणी मिळून आली. तीही कोलकात्याची होती. तिच्यासोबत रूममध्ये देवळी (ता. गंगापूर) येथील ३२ वर्षीय युवक होता. पाचव्या रूममध्ये घाणेगाव येथील ३२ वर्षीय युवक बसलेला होता.

त्याला पोलिसांनी विचारले असता त्याने वेश्यागमनासाठी वेटिंगमध्ये थांबल्याचे सांगितले. महिला व ग्राहकांना काउंटरवर असलेल्या, परंतु पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव विचारले असता त्यांनी तो रवी पोळ असल्याचे सांगितले. हा लॉज कृष्णा चव्हाण याच्या मालकीचे असून त्या ठिकाणी लागलेला क्युआर कोडवर कृष्णा चव्हाण असे नाव आले. काउंटरवर कंडोमचे पाकीट, एपिक लुब स्प्रे मिळून आला. सहाही रूममध्ये लाकडी कॉट व त्यावर गादी व बेडसीट टाकलेले दिसले. रूममध्ये वापरलेले कंडोम मिळून आले. युवतींना प्रत्येक ग्राहकामागे केवळ ५०० रुपये दिले जात होते. ग्राहकाकडून मात्र दीड हजार रुपये घेतले जात होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात करत आहेत.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसरे सेक्स रॅकेट
रविवारी रात्री आठला सहायक पोलीस आयुक्‍त संजय सानप यांच्या पथकाने साजापूर शिवारातील धुळे-सोलापूर हायवेलगत चौधरी टाइल्समागे पत्र्याच्या खोल्यांत सुरू असलेले सेक्स रॅकेट उद्‌ध्वस्त केले होते. २४, ३५ आणि ३० अशा वयोगटातील ३ तरुणींची सुटका केली होती. या तिन्ही तरुणी कोलकत्याच्या निघाल्या होत्या. कुंटणखाना मॅनेजर सलमान उस्मान सय्यद, शेडमालक श्याम मुरलधीर साळुंके (रा. कोलवाडी, ता. कन्नड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. (या घटनेची बातमी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने सोमवारी प्रसिद्ध केली आहे.) 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software