चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढता नशेचा बाजार, ५ दिवसांत LCB ची दुसरी कारवाई, पिसादेवीत ड्रग्ज तस्कर पकडला!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसादेवीत शनिवारी (१ नोव्हेंबर) रात्री उशिरा नशेच्या गोळ्या विकणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याकडून २८० गोळ्या जप्त केल्या आहेत. शेख सैफ शेख युसूफ (वय २०, रा. इंदिरानगर, बायजीपुरा, गल्ली क्र. १५) असे या तरुणाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

पिसादेवीत शेख सैफ नशेच्या गोळ्या विकत असल्याची माहिती राजपूत यांना मिळाली होती. त्यांनी मातोश्री हॉटेलच्या शेजारील पुलाजवळ सापळा रचला. मोपेडवरून शेख सैफ येताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्या मोपेडच्या डिक्कीत २८० गोळ्या आढळल्या. तो ग्राहकांना १०० ते २०० रुपयांत एक गोळी विकत असल्याचे चौकशीतून समोर आले. गोळ्यांसह १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याला चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस अंमलदार सचिन सोनार, प्रमोद पाटील, रवींद्र लोखंडे, दीपक सुरासे, बालवीरसिंग बहुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चिकलठाणा पोलिसांच्या हद्दीत सलग दोन कारवाया...
ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत येत असलेल्या चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेचा बाजार दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. गेल्या २९ ऑक्‍टोबरला स्थानिक गुन्हे शाखेनेच चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेवराईत कारवाई करून नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त करत बालासिंग करमसिंग टाक वय (वय ४८, रा. ब्रुक बॉन्ड आलाना गेवराई (ता. छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली होती. चिकलठाणा पोलिसांनी याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software