पाणीपुरीवाल्यासोबत ढिश्यूम ढिश्यूमऽऽ, हर्सूलच्या तुळजाभवानी चौकातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाणीपुरीची गाडी चालवणाऱ्यासोबत वाद झाल्याने दोघांनी त्याला मारहाण करत त्याच्या गाडीची नासधूस केली. ही घटना सोमवारी (२९ डिसेंबर) रात्री साडेनऊला हर्सूलच्या तुळजाभवानी चौकात घडली. हर्सूल पोलिसांनी मंगळवारी (३० डिसेंबर) अक्षय वाघ आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देवीलाल नंदराम सिरवी (वय ३०, रा. मयूरपार्क तुळजाभवानी चौक हर्सूल) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.  ते भेळ पाणी-पुरीची गाडी चालवतात. सोमवारी (२९ डिसेंबर) रात्री साडेनऊला तुळजाभवानी चौकात व्यवसाय करत असताना दोघे जण पाणीपुरी खाण्यासाठी आले. त्यातील एक जण अक्षय वाघ होता. त्या दोघांनी एक प्लेट पाणीपुरी मागितली. सिरवी काहीतरी पुटपुटला. त्यामुळे अक्षय वाघने त्याला विचारले, की क्या बोला रे ? त्यावरून सिरवी आणि दोघांत वाद झाला. यातून अक्षयने सिरवीला हातातील कडे डाव्या डोळ्यावर मारून जखमी केले. त्याच्या मित्राने सिरवी आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. हातगाडीवरील रगडा व पाणीपुरी जमिनीवर फेकून देत नासधूस केली. जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.  अधिक तपास पोलीस अंमलदार केशव काकडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software