- News
- सिटी क्राईम
- घरून पैसे मिळणे बंद झाल्यावर योगेशने सुरू केल्या दुचाकीचोऱ्या!; १५ दुचाकी जप्त, सिडको पोलिसांची कामग...
घरून पैसे मिळणे बंद झाल्यावर योगेशने सुरू केल्या दुचाकीचोऱ्या!; १५ दुचाकी जप्त, सिडको पोलिसांची कामगिरी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : रुग्णालयात साफसफाई करणाऱ्या आईने त्याला लहानाचे मोठे करण्यासाठी काबाड कष्ट केले. पण तो मोठा होताच वाईट संगतीत अडकला. नशेखोर बनला. नशेसाठी आईला पैसे मागू लागला. आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने दुचाकी चोऱ्या सुरू केल्या. त्यासाठी गुत्त्यावर ओळख झालेल्या एका मित्राला हाताशी धरले. सिडको पोलिसांनी अखेर त्याच्या पापाचा घडा भरवला. त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून, त्यांनी चोरलेल्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत.
योगेश आणि मुबारक यांनी टीव्ही सेंटरच्या जैस्वाल हॉलजवळील गीरजाई अभ्यासिकेच्या पार्किंगमधून अमोल रामभाऊ तांगडे (वय २७, रा. वडोद तांगडा, ता. भोकरदन, ह. मु. एन ९ सिडको पवननगर) याची दुचाकी १६ सप्टेंबरला दुपारी चोरली होती. अमोल एमपीएससीची तयारी करतो. सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या आदेशाने सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेवाळे, मंगेश पवार, विशाल सोनवणे यांच्या पथकाने दुचाकी चोरीचा तपास सुरू केला.
१८ सप्टेंबर रोजी जाधववाडीत एक जण स्वस्तात दुचाकी करत विकण्यासाठी विचारपूस असल्याचे कळल्यावर सुभाष शेवाळे, विशाल सोनवणे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, प्रदीप फरकाडे, सहदेव साबळे, अमोल अंभोरे यांनी तातडीने जाऊन योगेशच्या मुसक्या आवळल्या. मुबारकने शेतात ४ तर मामाच्या शेतात १० दुचाकी लपवल्या होत्या. या १५ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. योगेशविरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पैठणच्या गुन्ह्यात तो दीड वर्षापूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा दुचाकी चोऱ्या सुरू केल्या.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 11:12:00
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...

