- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरच्या लाचखोर सरकारी वकिलाला २३ नोव्हेंबरला पोलीस कोठडी, जिथे लाचखोरांविरुद्ध आक्रम...
छत्रपती संभाजीनगरच्या लाचखोर सरकारी वकिलाला २३ नोव्हेंबरला पोलीस कोठडी, जिथे लाचखोरांविरुद्ध आक्रमकपणे भिडायचा, तिथेच लाचखोरीचा झाला आरोपी!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाचखोर सरकारी वकील ॲड. शरद बन्सी बांगर याला विशेष न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी रविवारपर्यंत (२३ नोव्हेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी (२० नोव्हेंबर) दिले. अनेक वर्षे ज्या न्यायालयात लाचखोरांविरुद्ध बाजू मांडत होता, तिथेच त्याला स्वतःच्या लाचखोरीमुळे आरोपी म्हणून उभे राहण्याची वेळ आली.
लाचखोर सरकारी वकील ॲड. शरद बन्सी बांगर (वय ४३) याला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयातील त्याच्याच दालनातून अटक करत त्याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सहायक फौजदाराने एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे ॲड. बांगरची तक्रार केली होती. ते छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. २२ मार्च २०२२ रोजी लाच घेतल्याच्या प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटकही झाली होती. मात्र १९ नोव्हेंबर २०२४ रोजी ते या गुन्ह्यातून निर्दोष सुटले. न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी ॲड. बांगरने त्यांना २ लाख रुपयांची लाच मागितली. उतारवयात नसते झेंगट नको म्हणून दीड लाख रुपये सहायक फौजदारांनी दिलेही. मात्र उरलेल्या ५० हजारांसाठी बांगर त्यांना त्रास देत होता. काही दिवसांपासून त्याच्या सहायकाच्या क्रमांकावरून कॉल करून तो सतत पैशांची मागणी करायचा. त्यामुळे सहायक फौजदारांनी थेट एसीबीकडे धाव घेतली. एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांनी या प्रकरणात कारवाईसाठी जालना एसीबीला सांगितले होते. जालना एसीबीचे उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांनी तक्रारीची शहनिशा केली. बांगरने ५० हजारांऐवजी तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयातच सापळा लावण्यात आला. मात्र, बांगर कार्यालयात आलाच नाही. त्याने सहायक फौजदाराला तुम्ही आता तुमच्याच वकिलाला बोला, असे सांगितले होते. त्यामुळे १८ नोव्हेंबरला पुन्हा सापळा लावण्यात आला. एसीबीच्या केसेस लढत असल्याने बांगरला एसीबीच्या कारवायांची पद्धती माहिती होती. त्यामुळे त्याने लाच घेण्यास टाळाटाळ केली. पैसे आणून देतो, काही कमी करा, असे सहायक फौजदार म्हणाले, तेव्हाच त्याला संशय आला. मात्र तोपर्यंत त्याने लाच मागितल्याचे सबळ पुरावे एसीबीकडे आल्याने जालना एसीबी उपअधीक्षक बी. एस. जाधवर आणि पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांच्या पथकाने त्याला अटक केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
18 Mar 2026 20:07:32
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...

