छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मुद्रांक कार्यालयाला आग लावली!, CCTV मध्ये आग लावणारा ‘कैद’

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा मुद्रांक कार्यालय क्र. एकला शनिवार (९ जानेवारी) पहाटे आग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आगीत काही दस्त, संगणक जळाले असून, आग लावणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  मुद्रांक विभागाने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तहसील कार्यालयाची स्वच्छता करणाऱ्या महिलेला मुद्रांक कार्यालयात आग लागल्याचे दिसले. तिने सुरक्षारक्षकांना कळवले. सुरक्षारक्षकांनी वरिष्ठ अधिकारी व अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाने तातडीने येऊन आग विझवली. पहाटे ४:४५ वाजता आग लावणारा संशयित व्यक्ती बॅग घेऊन जाताना आणि त्यानंतर ४:५० च्या सुमारास कार्यालयातून आगीचा भडका उडाल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. सुरुवातीला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय होता.

सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर त्याच व्यक्तीने आग लावल्याचे समोर येत आहे. सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी सांगितले, संगणक साहित्य, टोकन भरलेले दस्त आगीत जळाले आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर मुद्रांक महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी दुपारी कार्यालयाला भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली. सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे, उप महानिरीक्षक विजय भालेराव यांनी पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. अधिक तपास सिटी चौक पोलीस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?

Latest News

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय? विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्‍हाप्रमुख अंबादास दानवे यांनी...
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
व्हिडीओ : बजाजनगरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद
भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software