छत्रपती संभाजीनगरात तरुणीवर लैंगिक अत्याचार : पीएसआय भागवत मुलगीरच्या नाशिकमधून आवळल्‍या मुसक्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : लग्नाचे आमिष दाखवून प्रेम जाळ्यात ओढल्यानंतर कॅफेत तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षक भागवत ज्ञानोबा मुलगीर (रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि.परभणी) याला क्रांती चौक पोलिसांनी बुधवारी (१९ नोव्हेंबर) अटक केली. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.

पोलीस उपनिरीक्षकाच्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होण्या आधीच भागवतला तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या यापूर्वी अनेक स्पर्धा परीक्षांत यश मिळवले आहे. एसटीआय परीक्षेतही त्याने विशेष प्रावीण्य मिळवले होते. पोलीस उपनिरीक्षकपदाची उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने पोलीस विभागात जाण्याचे ठरवले. इन्स्टाग्रामवर त्याने २ लाख ७५ हजार फॉलोअर्स आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनही करत होता. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, भागवत आणि तरुणी काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. याचदरम्यान एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांची ओळख झाली.

ओळखीतून मैत्री आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी भागवतने तिला क्रांती चौकातील कॅफेत नेले. तिथे त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती राहिलेल्या भागवतने गर्भपातासाठी तिला धमकावले. जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करत खासगी छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या.

अलीकडच्या काळात पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भागवतने तिच्यासोबत ब्रेकअप केले आणि तिला ब्लॉक केले. तरुणीने त्याची बहीण व वडिलांना भागवतशी असलेल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितले असता त्यांनीही तुला जे करायचे ते कर, असे म्हणत धमकावले. त्यानंतर तरुणीने १७ नोव्‍हेंबरला क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख करत आहेत.

शहरातील कॅफे पुन्हा चर्चेत... 
कॅफेत लैंगिक चाळे, अत्याचारांचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कॅफेंविरुद्ध मोठी मोहीम राबवली होती. यात अनेक कॅफेंमध्ये जोडप्यांची केलेली व्यवस्था पाहून सारेच चक्रावले होते. काही तासांसाठी कॅफे अगदी जोडप्यांसाठी लॉजमध्ये परावर्तीत होतात, हे दिसून आल्यानंतर कॅफेंविरुद्ध कारवाईसुद्धा करण्यात आली होती. नंतर ही मोहीम थंडावली तशी बहुतांश कॅफेमध्ये गैरप्रकार वाढत चालले आहेत. यातूनच ही बलात्काराची घटनाही समोर आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software