दोन आयशरमध्ये भरल्या चक्क २१ म्हशी!; चारा-पाण्याचीही सोय नाही... सातारा पोलिसांनी केली कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अत्‍यंत निर्दयीपणे दोन आयशर ट्रकमध्ये २१ म्हशी अगदी दाटीवाटीने कोंबून नेत असताना गोरक्षकांनी पकडले. पैठण रस्‍त्‍यावरील वाल्मी नाक्‍याजवळ सातारा पोलिसांनी कारवाई करत दोन्ही ट्रक जप्त केले आहेत आणि दोन्ही चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (१ डिसेंबर) सकाळी साडेसहाला करण्यात आली.

अमितकुमार सिंग अनिलकुमार सिंग (वय ३४, रा. मीरानगर पडेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते श्री सद्‌गुरू शंकर महाराज गोशाळेचे संचालक आहेत. ते गोरक्षणाचे काम करतात. त्यांना माहिती मिळाली होती, की पैठण रस्‍त्‍यावरील वाल्मी नाक्याजवळ दोन आयशर ट्रकमधून अतिशय क्रूरपणे म्हशी नेल्या जात आहेत. सिंग हे सहकाऱ्यांसह लगेचच तिथे पोहोचले. डायल ११२ ला कॉल करून पोलिसांनाही बोलावून घेतले. संशयित दोन्ही आयशर ट्रक थांबवले. त्यातील एका आयशर (MP12 ZD9255) मध्ये ११ म्हशी दाटीवाटीने अक्षरशः कोंबलेल्या होत्या. दुसऱ्या आयशरमध्ये (MP13GB2996) १० म्हशी दाटीवाटीने कोंबलेल्या होत्या.

दोन्ही आयशर चालकांना पोलिसांनी त्यांचे नाव, गाव विचारले असता सुलतान अब्दुल वहिद (वय २७, रा. गुलमोहर कॉलनी जि. खंडवा मध्यप्रदेश) व इसराईल सलीम शहा (वय ३८, रा. भमरासा जि. देवास, मध्यप्रदेश) अशी त्यांची माहिती समोर आली.  सिंग आणि अन्य गोरक्षक अक्षय नंदकुमार बोडखे, सुरज कैलास जाधव यांनी दोन्ही वाहनांत पाहिले असता म्हशीची कोणत्याही प्रकारची चारापाण्याची सोय न करता दाटीवाटीने भरून आलाना कंपनी पैठण रोड येथे घेऊन जात होते. एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत दोन्ही आयशरचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार तुकाराम सोनुने करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software