२ वर्षांपासून पत्नीसोबत वाद, अचानक ४ जणांनी युवकावर हल्ला केला, लाकडी दांड्याने बेदम मारहाण, म्हणाले, पुन्हा तुझ्या पत्नीसोबत संपर्क करू नको!, वाळूज एमआयडीसीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पत्नीसोबत २ वर्षांपासून वाद असलेल्या युवकावर वाळूज एमआयडीसीत ४ जणांनी बुधवारी (२२ ऑक्‍टोबर) रात्री १० च्या सुमारास सिनेस्‍टाइल हल्ला केला. लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून पुन्हा तुझ्या पत्नीसोबत संपर्क करू नको, असे धमकावले. यात युवक जखमी झाला असून, त्‍याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. यावरून पोलिसांनी ४ हल्लेखोरांविरुद्ध शुक्रवारी (२४ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र विजय प्रधान (वय ३३, रा. वडगाव कोल्हाटी, वाळूज एमआयडीसी परिसर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते खासगी कंपनीत नोकरी करतात. सध्या त्यांच्यावर सिडको वाळूज महानगरातील वाळूज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ते आई-वडील, भाऊ, बहिणीसह राहतात. त्यांचे लग्न २०१५ साली झाले असून, त्यांची पत्नी २ वर्षांपासून वेगळी  राहत आहे. त्यांना १ मुलगा, १ मुलगी आहे. दोघेही पत्नीकडेच राहतात. राजेंद्र यांनी अनेकवेळा पत्नीला एकत्र राहण्याबद्दल विनवण्या केल्या. मात्र तिने नकार दिला. फारकत घेण्यासाठी राहते घर नावावर करून मागत आहे. यावरून दोघांत २ वर्षांपासून वाद चालू आहेत. बुधवारी (२२ ऑक्‍टोबर) दुपारी २ च्या सुमारास राजेंद्र हे कंपनीत कामावर गेले. त्यानंतर रात्री १० ला कंपनीतून सुट्टी झाली. त्यानंतर ते कंपनीतून मोरे चौकाकडे भावाकडे जात असताना इंड्युरन्स कंपनीसमोर अचानक दोन मोटारसायकलीवरून तीन ते चार जण मागून आले. त्यांनी थांबायला सांगितले.

मात्र राजेंद्र न थांबल्याने त्यांनी त्यांची मोटारसायकल राजेंद्र यांच्या मोटारसायकलसमोर आडवी लावली. राजेंद्र यांच्यासोबत काही दिवस कंपनीत काम करत असलेला हर्षवर्धन लाठे मोटारसायकलीवरून उतरला. त्याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने राजेंद्र यांना पाठीवर, हातावर, डोक्यावर मारायला सुरुवात केली. राजेंद्र यांनी त्याला मला का मारहाण करत आहेस, असे विचारले असता लाठेसोबत असलेल्या ३ व्यक्तींनीही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, तसेच हाताचापटाने मारहाण सुरू केली. लाकडी दांड्याने पाय,  मांडीवर मारहाण करत तू परत शहरात दिसला तर तुझा काटा काढू, अशी धमकी दिली. जाताना हर्षवर्धन लाठे याने तू तुझ्या पत्नीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नको, असेही धमकावले. राजेंद्र यांनी भावाला कॉल करून बोलावून घेतले. त्यांच्या भावासोबत ते वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले. तिथून वाळूज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. अधिक तपास पोलीस अंमलदार मंगेश मनोरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software