शकीलच्या खुनाला प्रेमप्रकरणाची किनार...डांबून मारहाण सुरू असताना म्हणाला, जर मी इथून बाहेर पडलो तर तुम्हाला खानदानासहील मिटवून टाकेन... मारेकऱ्यांनी मग गळा चिरला!, छत्रपती संभाजीनगरच्या हॉरर मर्डर मिस्ट्रीची पूर्ण कहानी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेख शकील उर्फ सुरमा शेख आरेफी (वय ३०, रा. फुलेनगर, पंढरपूर, वाळूज एमआयडीसी) याच्या खुनाचा पूर्ण उलगडा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत केला आहे. या खुनाला प्रेमप्रकरण, मोबाइल आणि पैशांच्या देवाणघेवाणीची किनार असून, यातूनच मुख्य मारेकऱ्यासोबत शकीलचा वाद झाला होता. यातून शकीलला कारमधून पडेगावला नेत बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी शकीलने मारेकऱ्यांना ठणकावले, की मी जर इथून जीवंत बाहेर पडलो तर तुम्हाला तुमच्या खानदानासहीत मिटवून टाकेन... त्याची ही धमकी ऐकून ८ मारेकऱ्यांनी मग कासंबरी दर्गाजवळील डोंगरावर नेऊन शकीलची धारदार शस्‍त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली...

murde

सय्यद सिराज उर्फ मारी सय्यद नासरे (वय २९), कबीर शहा आयुब शहा (वय २५), शेख फैजान शेख गुलाम मोइयोद्दीन (वय २२), शेख राहील शेख शेख नजीर (वय २३), शेख शाहीद शेख नजीर (वय २९, सर्व रा. कासंबरी दर्गाजवळ, पडेगाव), शेख रिहान उर्फ जब्बार शेख इब्राहीम (वय २३, रा. बारूदनगर नाला, सिटी चौक), शेख साहील उर्फ बाबा शेख राजू (वय २३, रा. सिया मशिदीजवळ, बुढीलाइन) आणि अल्पवयीन मुलगा अशी मारेकऱ्याचं नावे आहेत. 
पडेगावच्या कासंबरी दर्गाजवळील डोंगरावर मंगळवारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात असलेला शकीलचा मृतदेह दिसला. ही माहिती दौलताबाद पोलिसांना कळविण्यात आली. माहिती कळताच शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, दौलताबादच्या पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, छावणीचे प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, फॉरेन्सिक तज्‍ज्ञांनाही घटनास्‍थळी पाचारण केले. दुपारी मृतदेह शकीलचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतक शकीलचा भाऊ सलमान आरेफ शेख (वय २८, रा. फुलेनगर, पंढरपूर) याने छावणी पोलीस ठाण्यात या हत्‍येप्रकरणी तक्रार दिली होती. 

अशी केली हत्या...
या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हे शाखेने सुरू केला. त्यासाठी ४ पथके तैनात केली. शकीलचा सय्यद सिराज आणि त्याच्या साथीदारांसोबत प्रेमप्रकरण, मोबाइल आणि पैशांवरून वाद असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे पोलिसांनी सय्यद सिराजला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांसोबत मिळून शकीलचा खून केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी घटनाक्रम समजून घेत अन्य मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. आमखास मैदानावरून त्यांनी शकीलला उचलून कारमध्ये डांबले. नंतर पडेगाव येथील सिराजच्या घरी नेत डांबून ठेवत बेदम मारहाण केली. यावेळी शकीलने त्यांना मी या ठिकाणावरून जीवंत वाचलो तर तुम्हाला तुमच्या खानदानासहीत मिटवून टाकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे मारेकऱ्यांनी त्याला कासंबरी दर्गाजवळील डोंगरावर नेले. तिथे त्याच्या शरीरावर सिगारेटचे चटके दिले. श्वास कमी होत गेल्यानंतर गळा व हाता-पायांच्या नसा कापल्या. त्यानंतर धारदार शस्‍त्राने गळा चिरून हत्या केली.

कॉल करून धमकी दिली होती...
शकील हा भाऊ सलमान व आई शरीफा उर्फ शकीला यांच्यासह राहत होता. हे कुटुंब आधी कासंबरी दर्गा भागात राहत होते. तेथील बडा सिराजसोबत शकीलची ओळख झाली होती. शकील ४ जानेवारीपासून बेपत्ता होता. मात्र, तो नेहमीच असाच दोन-तीन दिवस बेपत्ता राहत असल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही. बेपत्ता होण्यापूर्वी शकीलच्या आईला बडा सिराजने कॉल केला होता. शकीलने त्याचा घेतलेला मोबाइल, पैसे परत न केल्यास मर्डर करण्याची धमकी दिली होती. ४ जानेवारीला रात्री शकीलने कॉल करून सिराज व इतरांसह बाहेर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याचा मोबाइल बंद झाला होता. सिराज यापूर्वी २०१९ मध्येही हत्येच्या गुन्ह्यात अटक होता. सध्या तो जामिनावर होता. त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचेही अनेक गुन्हे दाखल आहेत.

२४ तासांत खुनाचा उलगडा करणारे पथक...
अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा करण्याची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, जगन्नाथ मेनकुदळे, अर्जुन कदम, अभिजीत चिखलीकर, पोलीस अंमलदार योगेश गुप्ता, योगेश नवसारे, अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा करण्याची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, जगन्नाथ मेनकुदळे, अर्जुन कदम, अभिजीत चिखलीकर, पोलीस अंमलदार योगेश गुप्ता, योगेश नवसारे, श्रीकांत काळे, विजय निकम, शोन पवार, सुनील जाधव, संजय गावंडे, गणेश सागरे, मनोहर गिते, मंगेश शिंदे, राजाराम डाखुरे, राहुल बंगाळे, सागर पांढरे, जालिंदर मोरे, विक्रम खंडागळे, बाळू नागरे, राजेश यदमळ, वाडीलाल जाधव, दीपक शिंदे, प्रमोद सुरसे, रियाज मोमीन, विजय घुगे, संजीवनी शिंदे, माया माळी, मनिषा नरोडे, तातेराव शिनगारे, दादाराव झारगड, संतोष चौरे यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software