आडदांड, गुंड प्रवृत्तीचा होता... कायद्याला जुमानत नव्हता... मग पोलिसांनी तिसरा डोळा उघडला, सरळ हर्सूल जेलमध्ये डांबला!; हा कुख्यात बाबुलाल मोरे आहे कोण?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कायद्यापुढे कोणी मोठा नसतो, गुन्हेगार स्वतःला कितीही हुशार, शक्तीशाली समजत असला तरी कायद्यापुढे त्याचे काहीएक चालत नाही. कायद्यातील पळवाटा शोधून कुख्यात गुन्हेगार बाबुलाल सुरसिंग मोरे (वय ४५, रा. बेलखेडा ता. कन्नड) याने अवघ्या कन्नड तालुक्याच्या नाकात दम आणला. पोलिसांनाही उघड उघड आव्हान देत राहिला. पण अखेर पोलिसांनी त्याचे दिवस भरवलेच. पोलिसांचा तिसरा डोळा उघडताच अशी मानगूट धरून आता त्याला हर्सूल जेलमध्ये डांबले आहे. आता वर्षभर तरी तो काही बाहेर येत नाही...

असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांना लक्ष्य केले आहे. त्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी ‘एमपीडीए’ कायद्याचा प्रहार त्यांच्यावर लागोपाठ सुरू आहे. आतापर्यंत अशा ८ धोकादायक, अवैध धंदेवाइक आणि सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्ध करण्याची कारवाई केली आहे. कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथील बाबुलाल मोरे हा आडदांड व गुंड प्रवृत्तीचा होता. तो कायद्याला जुमानत नव्हता. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांत दहशत निर्माण करायचा. या दहशतीच्या जोरावर गावठी हातभट्टी दारूचा धंदा करत होता. तो बनवत असलेली दारू मानवी आरोग्यास घातक होती.

त्यामुळे बेलखेडाजवळील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेकदा गुन्हे दाखल झाले. प्रतिबंधात्मक कारवाईसुध्दा करण्यात आली होती. मात्र त्याला काहीएक फरक पडत नव्हता. अखेर त्याच्यावर पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची वक्रदृष्टी त्याच्यावर पडली. त्यामुळे आता वर्षभर तो तुरुंगातून बाहेर पडणार नाही. डॉ. राठोड यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी (१४ नोव्‍हेंबर) बाबुलाल मोरेविरुद्ध स्थानबध्दतेचा आदेश पारित केला. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्याला उचलून हर्सूल कारागृहात डांबले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अपरजिता अग्निहोत्री, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व रामचंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव, पोलीस अंमलदार दीपक सुरोशे, अजय मोतींगे, प्रदीप पवार, शिवदास बोराडे, सुशीलकुमार बागुल, दिलवरसिंग वसावे यांनी पार पाडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software