पुंडलिकनगरजवळ ३ लुटारूंसोबत युवकाची झटापट, १ लाख ८० हजारांची सोन्याची चैन हिसकावून पसार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर परिसरातील गोकुळ स्वीट ते पारिजातनगर गार्डनच्या रोडवर दुचाकीवरून आलेल्या ३ लुटारूंनी ३२ वर्षीय युवकाला लुटल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (१९ नोव्‍हेंबर) रात्री १० च्या सुमारास लुटारूंनी युवकासोबत झटापट करत १ लाख ८० हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला.

मंगेश माधवराव निटोरे (वय ३२, रा. प्रसाद अपार्टमेंट, पारिजातनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते आई- वडिलांसोबत राहतात. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय असून, मंगेश खासगी नोकरी करतात. मंगळवारी (१९ नोव्‍हेंबर) रात्री १० ला जेवणानंतर मंगेश हे गोकुळ स्वीट ते पारिजातनगर गार्डनच्या रोडवर शतपावली करत होते. त्याचवेळी गोकुळ स्वीटकडून जय भद्रा गॅरेजच्या समोर मागून दुचाकीवरून तिघे आले.

एकाने ब्लॅक कलरचे जॅकेट, दुसऱ्याने ब्ल्यू कलरचे जॅकेट घातलेले होते. तिघांपैकी मधल्याने मंगेश यांच्या गळ्यातली सोन्याची ३० ग्रॅमची १ लाख ९० हजार रुपयांची चैन हिसकावली. तेव्हा मंगेश आणि लुटारूंमध्ये झटापट झाली. त्यांनी मंगेश यांना मारण्याचा प्रयत्न केला. मंगेश यांनी खाली पडलेला दगड उचलून त्यांना मारला, तेव्हा ते तिथून पळून गेले. त्यांनी काळ्या रंगाची टोपी घातलेली होती. ते दुचाकीने होळकर चौक दिशेने सोन्याची चैन घेऊन पळून गेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software