सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली हिट ॲन्ड रन : सुसाट कार स्कुटीला उडवून पसार, महिला गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कार स्कुटीस्वार दाम्पत्याला उडवून पसार झाली. यात पती जखमी तर, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (२९ डिसेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली घडली.

किशन दत्तराव देशमुख (वय ६३, रा. कॅनॉट प्लेस, एन ५ सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. सोमवारी (२९ डिसेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास ॲक्टिवा स्कुटीने (क्र. MH 20 FR 9196) ते व पत्नी मंगल (वय ५६) यांच्यासह गजानन महाराज मंदिराकडून कॅनॉट प्लेसकडे घरी येत होते. सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली हुंदाई कंपनीच्या इरा कारने (क्र. MH 20 CH 2297) त्यांना उडवले. यात देशमुख दाम्पत्य रोडवर जोरात पडले आणि जखमी झाले. मंगल यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल केले.

एफआयआरमधील नोंदीनुसार, मंगल यांच्यावर तिथे व्यवस्थित उपचार होत नसल्याने हेगडेवार हॉस्पिटलमध्ये ३० डिसेंबरला पहाटे एकच्या सुमारास हलविण्यात आले. अद्याप त्या शुद्धीवर आलेल्या नाहीत. अपघातानंतर कारचालक पळून गेला होता. नागरिकांनी देशमुख दाम्पत्याची मदत केली. सिडको पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भाऊसाहेब जगताप करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software