ज्योतीनगरातील साई दातांच्या दवाखान्यात चिमुकल्याला अमानुष मारहाणीचा आरोप, डॉक्टरसह कंपाऊंडरविरुद्ध गुन्हा दाखल, CCTV फूटेज तपासल्यानंतर धक्कादायक प्रकार आला समोर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्योतीनगर येथील साई दातांच्या दवाखान्यातील डॉ. राहुल बिराजदार (रा. सिद्धीसिद्धी अपार्टमेंट, ज्योतीनगर) आणि कंपाऊंडर किरण (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांविरुद्ध उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दातांच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेल्या ४ वर्षांच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. आई-वडिलांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर हा धक्कादायक प्रकार दिसून आला. दरम्यान, डॉ. राहुल बिराजदार यांनी आरोप फेटाळले आहेत.

प्रतापनगर भागातील रहिवासी ३१ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २७ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा मुलगा कार्तिकला (नाव बदलले आहे) दातांच्या दुखण्यामुळे डॉ. बिराजदारच्या दवाखान्यात आणले होते. डॉ. बिराजदारने औषध गोळ्या लिहून दिल्या. पुन्हा २८ ऑक्टोबरला तपासणीसाठी घेऊन यायला सांगितले. महिला तिच्या सासूसोबत कार्तिकला घेऊन दवाखान्यात आली असता डॉ. बिराजदारने उपचार केले. १ नोव्हेंबरला डॉ. बिराजदारने कार्तिकला रूट कॅनॉलसाठी घेऊन यायला सांगितले.  आई-वडील पुन्हा त्याला घेऊन आले. रूट कॅनॉलदरम्यान मुलगा रडत असल्याने डॉ. बिराजदारने दाम्पत्याला बाहेर जायला सांगितले. त्यामुळे दाम्पत्य बाहेर गेले. याचदरम्यान कार्तिकला अमानुष मारहाण झाल्याचा आरोप आहे.

बाहेर उभ्या वडिलांना कार्तिकच्या रडण्याचा आवाज असह्य झाल्याने त्यांनी आत धाव घेतली. ओक्सबोक्सी रडत असलेल्या कार्तिकला आई-वडील घरी घेऊन आले. घरी गेल्यावर आईला त्याच्या गालावर मारल्याचे वळ दिसले. मारहाणीबाबत कार्तिकच्या आई-वडिलांनी डॉ. बिराजदारला विचारले असता त्याने मारहाण केली नसल्याचे सांगितले. ३ नोव्‍हेंबरला रात्री कार्तिकचे आई-वडील सीसीटीव्ही फूटेज पाहण्यासाठी दवाखान्यात गेले. मात्र फूटेज ओपन होत नसल्याने त्यांना स्वतः डीव्हीआर घेऊन जा आणि तो दुरुस्त करून तपासा, असे सांगितले. दाम्पत्य डीव्हीआर घेऊन गेले आणि त्यांनी तो दुरुस्त करून तपासला असता १ नोव्‍हेंबरच्या फूटेजमध्ये डॉक्टर आणि कंपाऊंडर कार्तिकला अमानुष मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतापलेल्या दाम्‍पत्‍याने पुन्हा डॉ. बिराजदारकडे जात विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करून तुम्हाला बघून घेतो असे धमकावले, असा आरोप तक्रारीत केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे करत आहेत.

डॉक्टर काय म्हणतात?
या प्रकरणात आपल्यावरील आरोप डॉ. बिराजदार यांनी फेटाळले असून, त्यांनीही पोलिसांत चिमुकल्याच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार केली आहे. रुग्णालयात धिंगाणा घातला, मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. बळजबरीने डीव्हीआर नेत शहर सोडण्यासाठी धमकावले, असे आरोप डॉ. बिराजदार यांनी लावले आहेत. माझा कुठलाही दोष नसून आतापर्यंतच्या सेवेत मी कधीही गैरप्रकार केलेला नाही. या कुटुंबाकडून मला धोका आहे, असे डॉ. बिराजदार यांनी म्हटले आहे. त्यांच्या कंपाउंडरनेदेखील अशीच स्वतंत्र तक्रार पोलिसांत केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software