वाळूजमध्ये सामाजिक कार्यकर्तीला जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी; शिक्षण संस्थाध्यक्ष चेतन बोरोले, शिक्षक यशवंत महाजनविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सामाजिक कार्यकर्तीला जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिक्षण संस्थाध्यक्ष चेतन बोरोले व शिक्षक यशवंत महाजन या दोघांविरुद्ध वाळूज पोलिसांनी शुक्रवारी (७ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

पायल गजानन गणवीर (वय २६, रा. साईनगर वाळूज ता. गंगापूर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती जगदीश बुलबुले हे दैनिक एकनिष्ठा वृत्तपत्राचे संपादक आहे. त्यावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. पायल या सामाजिक कार्यकर्त्यासुद्धा आहेत. पायल यांना कळले, की रवींद्रनाथ इंग्रजी स्कूल, वाळूज नियमबाह्य स्थलांतरीत करण्यात आली आहे. लिटील चॅम्प व ज्ञानप्रबोधिनी स्कूल वाळूज या शाळांना मान्यता नाही. त्यानंतर पायल यांनी ही माहिती मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागितली.

मात्र माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पायल यांनी पुन्हा शिक्षण विभागाकडे तक्रार करत शाळेची चौकशी करण्याची मागणी केली. त्या शाळेवर शिक्षण म्हणून काम करणारे शिक्षक यशवंत महाजन हे पायल यांच्याच सोसायटीत राहतात. त्यांची व गणवीर कुटुंबीयांची ओळख आहे. २ ऑक्‍टोबर २०२५ रोजी रात्री साडेनऊला त्यांच्या सोसायटीत दुर्गामाता महिला मंडळाची देवी विसर्जन मिरवणूक चालू असताना सोबत लिंबाजी विश्वनाथ बिडवे, दादासाहेब हक्कम होते. त्यांच्यासमोर स्वरा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चेतन चंद्रकांत बोरोले (रा. समता कॉलनी, वाळूज) व शिक्षक यशवंत महाजन (रा. साईनगर, वाळूज) हे दोघे कारमध्ये आले.

कारमधून बाहेर येऊन चेतन बोरोले म्हणाला, की माझ्या शाळेसंदर्भात माहिती अधिकार व तक्रारी विनाकारण का करते? तुला एवढेच काम आहे का? माहिती अधिकाराचे अर्ज मागे घे व आता परत तक्रारी करू नको नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवंत मारून टाकेन, असे धमकावत त्याने जातीवाचक वाचक शिवीगाळ करून धमकी दिली. त्याच्यासोबत असलेला शिक्षक यशवंत महाजन हासुद्धा म्हणाला, की ही आमच्या सोसायटीत राहते व हेच काम करते, असे म्हणून त्यानेही जातीवाचक शिवीगाळ केली. दोघे तेथून निघून गेले. त्यानंतर ५ ऑक्‍टोबरला पायल यांनी आपले सरकार पोर्टल रीतसर तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर शुक्रवारी (७ नोव्‍हेंबर) वाळूज पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software