आकाशवाणी चौक ते बाबा पेट्रोलपंप... लोकांचा थरकाप उडवत सुसाट निघाली कार!; ‘वॉकीटॉकी’वरून वाहतूक पोलीस झाले अलर्ट, पुढे काय झालं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आकाशवाणी चौकाकडून बाबा पेट्रोलपंपच्या दिशेने पांढरी क्रेटा कार सुसाट निघाली, तिचा वेग आणि एकूण लोकांची पर्वा न करता चालकाचा बेदरकारपणा पाहता लोकांच्या काळजात धस्स झाले. वाहतूक पोलिसांना वॉकीटॉकीवरून नियंत्रण कक्षातून अलर्ट मिळाले, की कारला अडवा... अखेर सेशन कोर्ट सिग्नलवर ही कार अडविण्यात पोलिसांना यश आले. कार आणि चालकाला वेदांतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आकाश रामभाऊ फाटे (वय २५, रा. गंगापूर जहांगिर, शेंद्रा MIDC मारुती मंदिरजवळ, छत्रपती संभाजीनगर) असे या कारचालकाचे नाव आहे. तो हॉटेल व्यावसायिक असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. शनिवारी (२९ नोव्‍हेंबर) सोमनाथ जाधव आणि पोलीस अंमलदार नवनाथ गायकवाड यांची ड्युटी सेशन कोर्ट सिग्नलवर होती.

संध्याकाळी सहाला नियंत्रण कक्षातून वाकीटॉकीवरून दोघांना कळविण्यात आले, की जालना रोडवरील आकाशवाणी चौकाकडून बाबा पेट्रोलपंपच्या दिशेने पांढरी क्रेटा कार  (क्र. एमएच २० एफवाय ७६०४) भरधाव येत आहे. चालक बेदरकारपणे गाडी चालवत असून, लोकांचीही पर्वा करत नाहीये. त्या गाडीला ताब्यात घ्या. त्यामुळे लगेचच जाधव आणि गायकवाड यांनी रोडवर थांबून कारचालकाला इशारा करत थांबायला सांगितले. त्याला गाडीखाली उतरवून नियंत्रण कक्षाला कळवले. अधिक तपास पोलीस अंमलदार वर्षा मुंढे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software