१७ वर्षीय मुलीला मारहाण करून लॉजवर नेले, तिथे चुकीचे काही घडण्याआधीच मुलीचे कुटुंबीय धडकले!, सेव्हन हील परिसरातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर कालांतराने तिने बोलणे कमी केले. याचा राग येऊन २२ वर्षीय टवाळखोराने तिला भररस्‍त्‍यात मारहाण केली. आत्‍महत्‍येची धमकी देत सिडकोतील एका लॉजवर नेले. तिथे बळजबरी करत असताना मुलीचे कुटुंबीय लॉजवर धडकले. त्‍यामुळे मुलीची इभ्रत वाचली. हा धक्कादायक प्रकार सेव्हन हील परिसरात शुक्रवारी (२६ सप्टेंबर) रात्री घडला.

यश दिवेकर (वय २२, रा. मुकुंदवाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याने १७ वर्षीय मुलीला प्रेमात पाडले. कालांतराने मुलीने त्याच्याशी बोलणे कमी केले. काही दिवसांपासून तो सतत तिचा पाठलाग करून त्रास देत होता. यात मुलीचे शिक्षणातले लक्ष कमी झाल्याने कुटुंबाने तिला पुण्यातील मावशीकडे पाठवले होते. बुधवारी (२४ सप्टेंबर) ती शहरात परतली होती. शुक्रवारी रात्री मुलगी मावस बहिणीसोबत सूतगिरणी चौकात खरेदीसाठी गेली होती. त्‍याचवेळी यशने पाठलाग करत तिला गाठले. तिच्यासोबत बोलण्याचा हट्ट केला.

तिने नकार दिला. त्यावर यशने तिच्या कानशिलात मारली व सोबत येण्याचा हट्ट धरला. तिने नकार दिला असता तू सोबत आली नाहीस तर आत्महत्या करेन, असे धमकावले. त्यामुळे मुलगी त्याच्यासोबत रिक्षात बसली. गजानन महाराज मंदिराजवळ रिक्षातून उतरून दोघे पायी सेव्हन हिल परिसरातील एका लॉजवर गेले. तिथे खोली घेऊन तो तिच्यासोबत अनैतिक कृत्‍य करण्याआधीच ही बाब तेपर्यंत मावस बहिणीकडून मावशीला कळल्याने मावशीने तातडीने लॉजकडे धाव घेतली.

लॉजवर दोघे मिळून आले. मावशीच्या आक्रमक पवित्र्यामुळे मोठी गर्दी जमा झाली. या गर्दीचा फायदा उचलून यशने लॉजमधून पळ काढला. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सहकाऱ्यांसह लॉजवर धाव घेतली. यश दिवेकरविरुद्ध पोक्सो, विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी अल्पवयीन असूनही खोली दिल्याने लॉजचे सत्येंद्र कुमार रावत व वेटर सोनू विष्णू चव्हाण या दोघांना सहआरोपी करत पोलिसांनी अटक केली आहे. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना

Latest News

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software