किचनमध्ये भांडी घासताना मागून येत २३ वर्षीय मोलकरणीला धरले, तिने जोरात ओरडून जमवले लोक!, प्रतापनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उस्मानपुऱ्यातील प्रतापनगरात एका फ्‍लॅटमालकाच्या कारनाम्याने खळबळ उडाली आहे. किचनमध्ये भांडी घासत असलेल्या २३ वर्षीय मोलकरणीला मागून येत धरले आणि गैरकृत्याचा प्रयत्न केला. मोलकरणीने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे अपार्टमेंटमधील सर्व लोक जमले. त्यानंतर मोलकरणीने त्याच्या ताब्यातून सुटून बिल्डिंगखाली धाव घेतली. उस्मानपुरा पोलिसांनी फ्‍लॅटमालकाविरुद्ध ॲट्रॉसिटीसह वेगवेगळ्या कलमान्वये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) दुपारी ३ च्या सुमारास घडली.

सतीश द्वारकादास लोहिया (वय ५६, रा. प्रतापनगर, उस्मानपुरा) असे संशयिताचे नाव आहे. २३ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती धुणेभांड्याची कामे करते. सतीश लोहिया हा नेहमी तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. दुसऱ्या घरी कामाला जात असतानाही तो मागून यायचा. शुक्रवारी दुपारी ३ ला तरुणी लोहियाच्या घरी धुणी भांडी करण्यासाठी आली तेव्हा तो एकटाच घरी होता. ती किचनमध्ये भांडी घासत असताना तो मागून आला आणि वाईट उद्देशाने तिला धरले. आवाज करू नकोस, असे धमकावले.

मात्र तरुणीने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे लोक धावून आले. तरुणी त्याच्या तावडीतून सुटून घरी पळून आली. घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर तरुणी व तिच्या पतीने त्याला बिल्डिंगच्या खाली बोलावून जाब विचारला असता त्याने तिच्या पतीला मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केली. कुठे जायचे तिथे जा, माझे काही वाकडे करू शकत नाही, असेही धमकावले, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संग्राम ताठे करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software