रेल्वेतून लांबवले मुकुंदवाडीतील महिलेचे ३ लाखांचे दागिने, घरी आल्यावर प्रकार उघड

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : परभणीवरून गुंटूर रेल्वेने छत्रपती संभाजीनगरला आलेल्या महिलेचे ३ लाखांचे दागिने रेल्वे प्रवासातच चोरट्याने लंपास केले. घरी आल्यावर दागिने दिसून न आल्याने महिलेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध सोमवारी (२९ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

मनिषा उत्तमराव वाकळे (वय ३०, रा. रामनगर मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. २४ डिसेंबरला गुंटूर एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये त्या प्रवास करत असताना मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर उतरल्या. नंतर पतीसोबत मोटारसायकलीवरून घरी रामनगरला आल्या. दुसऱ्या २५ डिसेंबरला सकाळी ११ ला त्यांनी प्रवासातील ट्रॉली बॅग तपासली असता त्यातील छोटी पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आले. या पिशवीत १ लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे शॉर्ट गंठण, ३५ हजार ४६१ रुपयांचे सोन्याचे झुमके, ७ हजार २०० रुपयांची सोन्याची नथ, ५ तोळ्यांची चांदीची चैन, १ लाख ४ हजार ९६० रुपयांचे सोन्याचे पेंडल, ३५ हजारांचे मणी मंगळसूत्र असा एकूण २ लाख ९३ हजार ९७२ रुपयांचा ऐवज होता. मनिषा वाकळे आधी परभणी रेल्वे पोलीस चौकीत तक्रार केली होती. तिथून हा गुन्हा छत्रपती संभाजीनगरला वर्ग करण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software