हिट ॲन्‍ड रन…दुचाकीस्वार दाम्‍पत्‍याला उडवून भरधाव वाहन पसार, दर्गा चौकाजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवल्याने पती-पत्‍नी गंभीर जखमी झाले. ही घटना शासकीय दूध डेअरी चौक ते दर्गा चौक रोडवरील हॉटेल पाकिजासमाेर बुधवारी (७ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणात जखमींच्या मुलाने जवाहरनगर पोलीस ठाण्यात रविवारी (११ ऑगस्ट) तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महावीर सेठी व […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवल्याने पती-पत्‍नी गंभीर जखमी झाले. ही घटना शासकीय दूध डेअरी चौक ते दर्गा चौक रोडवरील हॉटेल पाकिजासमाेर बुधवारी (७ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणात जखमींच्या मुलाने जवाहरनगर पोलीस ठाण्यात रविवारी (११ ऑगस्ट) तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महावीर सेठी व मंगला सेठी (दोघे रा. छत्रपतीनगर, देवळाई चौक, बीड बायपास) अशी जखमी दाम्‍पत्‍याची नावे अाहेत. ते मोटारसायकलीने त्‍यांच्या बालाजीनगरातील ऋषिराज रेडिमेड दुकानावरून घरी परतत होते. महावीर सेठी यांच्या डोक्‍याला व छातीला गंभीर मार लागला आहे. त्‍यांच्यावर सिग्‍मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून ते शुद्धीवर नाहीत. मंगला सेठी याही जखमी आहेत. अधिक तपास पोलीस अंमलदार इंदलसिंग मेहेर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!

Latest News

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा! टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...
ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software