- News
- सिटी क्राईम
- मोठी बातमी : संदीप पालवे ACB चे नवे पोलीस अधीक्षक; रोहिदास पवार छ. संभाजीनगरचे नवे DCP
मोठी बातमी : संदीप पालवे ACB चे नवे पोलीस अधीक्षक; रोहिदास पवार छ. संभाजीनगरचे नवे DCP
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पोलीस अधीक्षक, उपायुक्त श्रेणीतील अधिकारी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्याही काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. -संदीप पालवे सध्या छत्रपती संभाजीनगरला दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी होते, त्यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पोलीस अधीक्षक, उपायुक्त श्रेणीतील अधिकारी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्याही काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
-मीना मकवाणा छत्रपती संभाजीनगरला राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त होते. त्यांची बदली ठाणे शहरात पोलीस उपायुक्त म्हणून झाली आहे.
-छत्रपती संभाजीनगरच्या राज्य गुप्तवार्ता विभागाची सूत्रे उपायुक्त म्हणून लता पाटलोबा फड यांच्याकडे आली आहेत. त्या आधी पुण्यात महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक होत्या.
-अनिता जामदार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या महामार्ग सुरक्षा पथकाची जबाबदारी होती, त्यांच्याकडे आता छत्रपती संभाजीनगरच्याच नागरी हक्क संरक्षण विभागाची जबाबदारी पोलीस अधीक्षक म्हणून आली आहे.
-रोहिदास पवार यांची बदली छत्रपती संभाजीनगरला पोलीस उपायुक्त म्हणून झाली आहे. ते पुण्यात पोलीस उपायुक्त होते.
-सचिन गुंजाळ यांची बदली दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगरात झाली आहे. ते आधी ठाणे शहरात पोलीस उपायुक्त होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 13:06:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...

