मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये बॉम्बाबोंब!, धमकी ई-मेल आल्याने कसून तपासणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील चिश्तिया चौकातील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये सोमवारी (१९ ऑगस्ट) एकच खळबळ उडाली. बॉम्बने हॉस्पिटल उडवण्याच्या धमकीचा ई-मेल इंग्रजीतून आला. हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी ३ तास शोध मोहीम राबवली. मात्र संशयास्पद, स्‍फोटक असे काही आढळले नाही. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, बॉम्ब शोधक नाशक पथकाचे निरीक्षक पंकज उदावंत यांनी पथकासह […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील चिश्तिया चौकातील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये सोमवारी (१९ ऑगस्ट) एकच खळबळ उडाली. बॉम्बने हॉस्पिटल उडवण्याच्या धमकीचा ई-मेल इंग्रजीतून आला. हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी ३ तास शोध मोहीम राबवली. मात्र संशयास्पद, स्‍फोटक असे काही आढळले नाही.

सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, बॉम्ब शोधक नाशक पथकाचे निरीक्षक पंकज उदावंत यांनी पथकासह हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन रुग्णालयाची प्रत्येक बाजू तपासली. धमकी ई-मेल खोटा असल्याचे आणि दहशत माजविण्यासाठीच असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्‍हणजे, पुण्यातही विमाननगर भागात असलेले फिनिक्स मार्केट सिटी माॅल बाॅम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आला होता. मॉल प्रशासनाच्या माहितीनंतर पुणे पोलिसांनीही कसून तपासणी केली. पण काही संशयास्पद आढळले नाही. रविवारी सकाळी ई-मेल आला होता. तो सोमवारी सायंकाळी बघण्यात आल्यानंतर साडेसहानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये एंट्री घेतली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software