मॅरिड असल्याचे लपवून ठेवत डॉक्‍टर तरुणीवर फेकले प्रेमाचे जाळे; डॉक्‍टर युवकाचे कृत्‍य, २ वर्षे कधी हॉटेलमध्ये, तर कधी कारमध्ये करत होता बलात्‍कार, छत्रपती संभाजीनगरातील हायप्रोफाइल लव्हस्टोरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित डॉक्टरने डॉक्‍टर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कधी शहरातील अलिशान हॉटेलमध्ये नेत, तर कधी कारमध्ये बलात्‍कार केला. दारू पिऊन तो शारीरिक संबंध ठेवत होता, असे तरुणीने तक्रारीत म्‍हटले आहे. तो विवाहित असल्याचे कळल्यानंतर तरुणीने जाब विचारला असता त्‍याने डिव्होर्स झाल्याचे सांगितले. मात्र नंतर डिव्होर्सची कागदपत्रेही दाखविण्यास टाळाटाळ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित डॉक्टरने डॉक्‍टर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कधी शहरातील अलिशान हॉटेलमध्ये नेत, तर कधी कारमध्ये बलात्‍कार केला. दारू पिऊन तो शारीरिक संबंध ठेवत होता, असे तरुणीने तक्रारीत म्‍हटले आहे. तो विवाहित असल्याचे कळल्यानंतर तरुणीने जाब विचारला असता त्‍याने डिव्होर्स झाल्याचे सांगितले. मात्र नंतर डिव्होर्सची कागदपत्रेही दाखविण्यास टाळाटाळ करू लागला. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर डॉक्‍टर युवतीने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. वरुण बाळासाहेब गवळी (४०, एन- १, सिडको) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. डॉक्‍टर तरुणीसोबत लैंगिक शोषणाचे सत्र ११ सप्टेंबर २०२२ ते १ जुलै २०२४ दरम्यान चालले. शनिवारी (१३ जुलै) या प्रकरणात तिने पोलिसांत तक्रार दिली. जालना रोडवरील एका प्रसिद्ध रुग्णालयात कोरोना काळात डॉक्टर तरुणीची डॉ. वरुण गवळीशी ओळख झाली होती. दोघेही चेस्ट फिजिशीयन म्हणून काम पाहत होते. कोरोना काळात चांगले काम केल्याने डॉ. वरुणने तरुणी व सोबत काम करणाऱ्या अन्य सहकारी डॉक्‍टर तरुणींना अलिशान हॉटेलमध्ये जून २०२१ मध्ये जेवणाची पार्टी दिली होती. यातून पीडित डॉक्‍टर तरुणीची डॉ. वरुणशी मैत्री झाली. मैत्री वाढत जाऊन दोघे घनिष्ठ मित्र झाले.

जून २०२२ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांना कामावरून कमी करण्यात आले होते. यात पीडित तरुणीलाही नोकरी गमवावी लागली. यानंतर डॉ. वरुण गवळीने तरुणीला फोन करून मॅनेजमेंटशी चर्चा करून तुला पुन्हा कामावर घ्यायला सांगतो, असे सांगितले. त्याच्या प्रयत्नाने ती बाह्य रुग्ण विभागात निवासी डॉक्टर म्हणून पुन्हा रुजू झाली. त्यानंतर दोघांत भेटीगाठी सुरू झाल्या. त्‍याने तिला प्रेमाची मागणी घातली. २०२२ मध्ये डॉ. वरुण तिला एका अलिशान हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. तिथे तिला लग्नाची मागणी घातली. अंगठी घालून तिला दारू पिण्यासाठी बळजबरी केली. त्यानंतर दोघे त्याच हॉटेलमधील रूममध्ये गेले. तिथे दारूच्या नशेत असताना डॉ. वरुणने तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले.

या बलात्‍काराचे फोटो त्याने टॅब, मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये ठेवल्याचे तरुणीने तक्रारीत म्‍हटले आहे. नंतर त्याने वारंवार दोन वर्षे तरुणीला अलिशान हॉटेलमध्ये नेत शारीरिक संबंध ठेवले. एकीकडे उपभोग घेत असताना दुसरीकडे मात्र डॉ. वरुण लग्नाला टाळाटाळ करत होता. त्यामुळे तरुणीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे डॉ. वरुण तिला भेटायचे टाळू लागला. तरुणीने त्याचे घर गाठले असता त्‍याची पत्नी समोर आली.

त्‍याच्‍या पत्‍नीला भेटल्यानंतर खोटे बोलून प्रेमात अडकवल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर डॉ. वरुणने तिला घटस्फोट झाल्याचे सांगितले. अशातच काही दिवसांपूर्वी १ जूनला मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास डॉ. वरुणने तिच्यावर कारमध्ये बलात्कार केला. त्यानंतर तरुणीने त्‍याला घटस्फोटाची कागदपत्रे मागितली. मात्र त्‍यालाही तो टाळू लागला. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर डॉक्‍टर तरुणीने सिडको पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसंानी बलात्‍कार आणि फसवणुकीचा गुन्हा डॉ. वरुणविरुद्ध दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software