मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवरच युवकाला टवाळखोरांनी लुटले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवर दोन टवाळखोरांनी आज, २७ एप्रिलला पहाटे साडेतीनच्या सुमारास युवकाला लुटले. हा युवक अहिल्यानगर येथून शहरात आला होता. प्रवीण भगवान शेजूळ (वय ३०, रा. सुतगिरणी, इंदिरानगर, गारखेडा परिसर) असे लुटले गेलेल्या युवकाचे नाव आहे. तो मिस्तरी काम करतो. त्‍याचा भाऊ घाटी रुग्णालयात दाखल असल्याने त्‍याला भेटण्यासाठी अहिल्यानगरहून शहरात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवर दोन टवाळखोरांनी आज, २७ एप्रिलला पहाटे साडेतीनच्या सुमारास युवकाला लुटले. हा युवक अहिल्यानगर येथून शहरात आला होता.

प्रवीण भगवान शेजूळ (वय ३०, रा. सुतगिरणी, इंदिरानगर, गारखेडा परिसर) असे लुटले गेलेल्या युवकाचे नाव आहे. तो मिस्तरी काम करतो. त्‍याचा भाऊ घाटी रुग्णालयात दाखल असल्याने त्‍याला भेटण्यासाठी अहिल्यानगरहून शहरात आला. बसस्थानकावर उतरल्यानंतर गेटवरच दोघांनी त्‍याला अडवले. तुझ्या खिशात काय आहे ते काढ, असे म्‍हणून दोन कानफटात मारल्या. गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत पँटच्या खिशातून २० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावला. नंतर पळून गेले. दोन्ही लुटारू २० ते २५ वयोगटातील होते. एकाच्या अंगात काळा-पांढरा शर्ट, काळी जिन्स पँट, दुसऱ्याच्या अंगात गुलाबी टी शर्ट, निळी जिन्स होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना

Latest News

सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
पाचोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या युवतीला सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर प्रेमात पाडले, नंतर ४ महिने दोघे एकत्र...
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software