- News
- सिटी क्राईम
- मंगळसूत्र चोरांचे वाळूज MIDC पोलिसांना आव्हान!; आणखी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले!!, महिला धास्ताव...
मंगळसूत्र चोरांचे वाळूज MIDC पोलिसांना आव्हान!; आणखी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले!!, महिला धास्तावल्या…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील महिला एकट्यादुकट्या जायला आता घाबरू लागल्या आहेत. कारण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केले असून, मंगळसूत्र हिसकावून ते पळ काढत आहेत. चोरी करताना अत्यंत निर्दयीपणे ते मंगळसूत्र हिसकावतात. धक्का देऊन पाडतात. मंगळवारी बजाजनगरातील चिंचबन कॉलनीत शतपावली करणाऱ्या ५० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर बुधवारीही (३ जुलै) सायंकाळी सातच्या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील महिला एकट्यादुकट्या जायला आता घाबरू लागल्या आहेत. कारण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केले असून, मंगळसूत्र हिसकावून ते पळ काढत आहेत. चोरी करताना अत्यंत निर्दयीपणे ते मंगळसूत्र हिसकावतात. धक्का देऊन पाडतात. मंगळवारी बजाजनगरातील चिंचबन कॉलनीत शतपावली करणाऱ्या ५० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर बुधवारीही (३ जुलै) सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून ट्रिपलसीट आलेल्या चोरट्यांनी शिक्षिकेचे २४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
मंगळसूत्र हिसकावल्यानंतर चोरट्यांनी थोडे अंतर जाऊन दुचाकी थांबवली. मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याने हेल्मेट व तोंडाला बांधलेला रुमाल काढून काळवणे यांच्याकडे पाहिले आणि नंतर सुसाट पसार झाले. या प्रकारामुळे घाबरलेल्या काळवणे यांना ओरडण्याचेही सूचले नाही. नंतर त्यांनी चोर… चोर… म्हणून आरडा-ओरड केली. तोपर्यंत पसार झाले होते. त्यांनी घरी येऊन कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर वाळूज एमआडीसी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. तपास पोलीस अंमलदार श्री. वैष्णव करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
18 Mar 2026 20:07:32
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...

