भरधाव कॅश व्हॅनने ५५ वर्षीय महिलेला चिरडले, हर्सूल सावंगीची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एटीएम सेंटरच्या रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या व्हॅनने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्‍या हर्सूल सावंगीजवळ  फुलंब्री-छत्रपती संभाजीनगर मार्गावर मंगळवारी (५ नोव्‍हेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. अलकाबाई भाऊसाहेब दहिहंडे (वय ५५, रा. सावंगी शिवार) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. व्हॅन फुलंब्रीकडून छत्रपती संभाजीनगरकडे येत होती. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एटीएम सेंटरच्या रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या व्हॅनने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्‍या हर्सूल सावंगीजवळ  फुलंब्री-छत्रपती संभाजीनगर मार्गावर मंगळवारी (५ नोव्‍हेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. अलकाबाई भाऊसाहेब दहिहंडे (वय ५५, रा. सावंगी शिवार) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

व्हॅन फुलंब्रीकडून छत्रपती संभाजीनगरकडे येत होती. अलकाबाई फुलंब्री-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रस्‍ता ओलांडण्यासाठी उभ्या होत्‍या. भरधाव व्हॅनने (क्र. एमएच १२ यूएम १३१५) त्‍यांना जोरात धडक दिली आणि अपघातानंतर व्हॅन पसार झाली. अलका रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्‍या. त्‍यांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. बुधवारी त्‍यांच्या पार्थिवावर अंत्‍यसंस्कार करण्यात आले. व्हॅनचालकाविरुद्ध फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्हॅन पोलीस ठाण्यात जमा केली आहे. बुधवारी अलका यांच्यावर अंत्‍यसंस्कार करण्यात आले. अलका यांचे पती भाऊसाहेब व त्‍यांचे भाऊ भानुदास यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र राहतात. त्‍यांचा शेती व दूध विक्रीचा व्यवसाय आहे. त्‍यांचे चुलते भानुदास व पुतण्या रामेश्वर यांचा विविध प्रकारच्या खिडक्‍या तयार करण्याचा व्यवसाय आहे. अलका यांची दोन मुले शिक्षण घेतात.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software