बारावीत शिकणाऱ्या मुलीचे कॉलेजमधून अपहरण!, जटवाडा रोड भागातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे कॉलेजमधून अपहरण करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा रोड भागात बुधवारी (४ डिसेंबर) दुपारी दोनला समोर आली. मुलीच्या भावाने हर्सूल पोलीस ठाण्यात बहिणीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली आहे. भावाने तिला सकाळी साडेदहाला जटवाडा भागातील कॉलेजमध्ये सोडले. दुपारी २ ला तो परत तिला घ्यायला आला असता बहीण […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे कॉलेजमधून अपहरण करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा रोड भागात बुधवारी (४ डिसेंबर) दुपारी दोनला समोर आली.

मुलीच्या भावाने हर्सूल पोलीस ठाण्यात बहिणीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली आहे. भावाने तिला सकाळी साडेदहाला जटवाडा भागातील कॉलेजमध्ये सोडले. दुपारी २ ला तो परत तिला घ्यायला आला असता बहीण कॉलेजमध्ये दिसली नाही. आजूबाजूला, नातेवाइकांकडे चौकशी केली, मात्र ती मिळून आली नाही. तिचे कुणीतरी अपहरण केल्याची शक्‍यता त्‍याने पोलीस तक्रारीत व्यक्‍त केली आहे. मुलगी कोळीवाडा राधास्वामी कॉलनीतील आहे. शाळेत १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ असल्याने ती लाल साडी, लाल ब्लाऊज, सोबत काळी बॅग आणि काळा गॉगल घालून गेली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software