बाप्पा आलेऽऽ… घरोघरी गणरायाचे आगमन सुरू; शहरात ४ हजार, ग्रामीण भागात २ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गणपती बाप्पाचे स्वागत घरोघरी जल्लोषात होत आहे. वाजतगाजत गणरायाला घरी आणून विधिवत प्रतिष्ठापना केली जात असून, आता पुढचे दहा दिवस गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांडून मिरवणूक काढून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना दुपारपासून सुरू केली जाईल. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरण पार पाडण्यासाठी विघ्नहर्त्याचे दूत असलेले पोलीसही अलर्ट मोडवर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गणपती बाप्पाचे स्वागत घरोघरी जल्लोषात होत आहे. वाजतगाजत गणरायाला घरी आणून विधिवत प्रतिष्ठापना केली जात असून, आता पुढचे दहा दिवस गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांडून मिरवणूक काढून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना दुपारपासून सुरू केली जाईल. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरण पार पाडण्यासाठी विघ्नहर्त्याचे दूत असलेले पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर शहरात ४ हजार तर ग्रामीणमध्ये २ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी २०८ आणि ग्रामीण पोलिसांनी ९०७ विघ्नसंतोषींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. महिलांच्या सुरक्षेवर यंदा विशेष भर देण्यात आला आहे. दामिनी पथक आणि पिंक पथक कायम गस्तीवर राहणार आहे.

शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर हद्दीत, तर पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण हद्दीत त्‍या त्‍या ठाणे प्रभारींनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात ७ गणेश महासंघ असून, ९०० सार्वजनिक मंडळे आहेत. १ लाख ५५ हजार ९५० घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होईल. शहरात ४ हजार १६५ पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. यात ४ पोलीस उपायुक्त, ७ सहायक पोलीस आयुक्त, ४० पोलीस निरीक्षक, १४० सहायक पोलीस निरीक्षक- उपनिरीक्षक, तीन हजार पोलीस अंमलदार, १ एसआरपीएफ कंपनी, ५०० होमगार्ड, वाहतूक शाखेचे २७४ अंमलदार आणि आरसीपीचे ४ प्लाटून असा ४ हजार १६५ पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे.

याशिवाय, नियंत्रण कक्षात पुरुष आणि महिला पोलीस अंमलदारांच्या ७ स्ट्रायकिंग फोर्स राखीव ठेवल्या आहेत. नागरिकांनी मदतीसाठी डायल ११२ या नंबरवर कॉल करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले आहे. ग्रामीण भागात दीडशे अधिकारी, १२५० पोलिस अंमलदार, एक एसआरपीएफ कंपनी, ६५० होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात आहे. यंदा जवळपास ५०० गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जाईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी पत्रकारांना सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software