- Marathi News
- सिटी क्राईम
- बजाजनगरातील मतदान केंद्रावर ‘उद्धटशाही’; राजू शिंदेंसह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, निकाल येण्याआधीच
बजाजनगरातील मतदान केंद्रावर ‘उद्धटशाही’; राजू शिंदेंसह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, निकाल येण्याआधीच आमदार झाल्याच्या थाटात पोलिसांना अरेररावी, धमक्या, ‘अंतरवाली सराटीतील पोलिसांसारखी तुमची हालत करू’; राजू शिंदेंची पोलिसांना धमकी, नक्की काय घडलं, दंगा
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : निकाल येण्याआधीच आमदारकी अंगात शिरलेल्या काहींनी कार्यकर्त्यांच्या बळावर बुधवारी (२१ नोव्हेंबर) अक्षरशः धुमाकूळ घातला. मतदान शांततेत पार पाडण्याच्या उद्देशाने अहोरात्र झटणाऱ्या यंत्रणेच्या मेहनतीवर पाणी फेरू नये म्हणून पोलीस कमालीचे संयमाने वागल्याचे दिसून आले. त्याचा गैरफायदा घेतल्याचे बजाजनगरातील घटनेवरून समोर आले आहे. बजाजनगरातील अल्फोन्सा शाळेच्या मतदान केंद्रावर जे घडले, ते धक्कादायक […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : निकाल येण्याआधीच आमदारकी अंगात शिरलेल्या काहींनी कार्यकर्त्यांच्या बळावर बुधवारी (२१ नोव्हेंबर) अक्षरशः धुमाकूळ घातला. मतदान शांततेत पार पाडण्याच्या उद्देशाने अहोरात्र झटणाऱ्या यंत्रणेच्या मेहनतीवर पाणी फेरू नये म्हणून पोलीस कमालीचे संयमाने वागल्याचे दिसून आले. त्याचा गैरफायदा घेतल्याचे बजाजनगरातील घटनेवरून समोर आले आहे. बजाजनगरातील अल्फोन्सा शाळेच्या मतदान केंद्रावर जे घडले, ते धक्कादायक आहे. दंगा काबू पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले यांनी या प्रकरणात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज, २१ नोव्हेंबरला एफआयआर नोंदवला आहे. त्यावरून राजू शिंदे यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना अरेरावी, उद्धट वागणूक देण्यात आली. अंतरवाली सराटातील पोलिसांसारखी तुमची हालत करू, अशी धमकी देण्यात आली… सर्वच धक्कादायक आहे…
त्यावर राजू शिंदे व त्यांचे कार्यकर्ते हे मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह मशाल दाखवून मतदान करण्याबाबत सांगत होते. त्यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी राजू शिंदे व त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना उद्देशून जमावबंदीचे आदेश आहेत. तुम्ही रस्ता अडवू नका. येथून निघून जा, असे सांगितले. राजू शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बगाटे यांच्या सूचनाकडे दुर्लक्ष केले करत उलट पोलिसांशी अरेरावीची भाषा केली. उध्दट वर्तन करून राजू शिंदे यांनी “अंतरवाली सराटीतील पोलिसांसारखी तुमची हालत करू’, अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांच्याविरुध्द आणखी कार्यकर्ते बोलावून घेत रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना ५ ते ७ मिनिटांमध्ये रस्त्यावरून काढले. अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे करत आहेत.