पहिला दारूडा, दुसरा ‘इंटरकास्ट’वाला त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे; रोज पिऊन यायचा अन्‌ तिला कुटत बसायचा… विवाहितेची आत्‍महत्‍या, छ. संभाजीनगरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पहिला दारूडा होता, खूप त्रास द्यायचा, वैतागून तिने त्‍याच्यापासून फारकत घेतली. दुसरे आंतरजातीय लग्‍न केले. तो पहिल्यापेक्षा एक पाऊल पुढे निघाला. रोज दारू पिऊन यायचा अन्‌ तिला कुटत (मारहाण) बसायचा… दीर वाईट बोलायचा, जाऊ राबवून घ्यायची… त्रास असह्य होत गेला, परत जाण्याचे मार्ग संपले होते, अखेर तिने गळफास घेऊन आयुष्य […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पहिला दारूडा होता, खूप त्रास द्यायचा, वैतागून तिने त्‍याच्यापासून फारकत घेतली. दुसरे आंतरजातीय लग्‍न केले. तो पहिल्यापेक्षा एक पाऊल पुढे निघाला. रोज दारू पिऊन यायचा अन्‌ तिला कुटत (मारहाण) बसायचा… दीर वाईट बोलायचा, जाऊ राबवून घ्यायची… त्रास असह्य होत गेला, परत जाण्याचे मार्ग संपले होते, अखेर तिने गळफास घेऊन आयुष्य संपवले… ही घटना शनिवारी (२६ एप्रिल) सकाळी ११ च्या सुमारास सातारा परिसरातील देवळाई भागात घडला.

ज्योती शैलेश पाध्ये (रा. हिमालया रेसिडेन्सी, खडी रोड, देवळाई) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी पती शैलेश शरदराव पाध्ये, सासू मंगल, दीर योगेश, जाऊ गायत्री, चुलत सासरा मुकुंद आणि त्याची पत्नी (रा. कळमनुरी, जि, हिंगोली) यांच्याविरुद्ध रविवारी (२७ एप्रिल) गुन्हा दाखल केला. त्‍यांच्याविरुद्ध ज्‍योतीची आई चंद्रकला सुरेश सोनवणे (रा. पिसादेवी रोड) यांनी तक्रार दिली.

तक्रारीनुसार, ज्योतीचे पहिले लग्‍न २०११ मध्ये चिकलठाण्यातील एका तरुणाशी झाले होते. मात्र, तो दारूडा निघाला. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने घटस्‍फोट घेतला. नंतर शैलेशने तिला लग्नासाठी मागणी घातली. पहिल्या लग्नाबद्दल आणि जाती वेगळ्या असल्याबद्दल ज्योतीने त्याला सर्व सांगितले होते. तरीही तो लग्नाला तयार झाला. १३ मार्च २०२३ रोजी शैलेशसोबत ज्योतीचा विवाह झाला. लग्नानंतर दोनच महिने शैलेशने तिला चांगले वागवले. नंतर दारू पिऊन घरी येत तिला मारहाण करू लागला.

सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. चुलत सासरा मुकुंद आणि त्याची पत्नी त्यांना भडकावून द्यायचे. दीर तिला वाईट बोलायचा. ज्योतीला एकटीलाच घरातील सर्व कामे करायला लावायचे. जाऊ गायत्री चहापासून जेवणापर्यंत सर्व बेडवर तिला आणून द्यायला सांगायची. एवढे करूनही ज्‍योतीला पुरेसे खायला सुद्धा दिले जात नव्हते. कालांतराने ज्योती आणि शैलेश वेगळे राहू लागले, तरी शैलेशच्या वागण्यात काही फरक पडला नाही. अखेर तिने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software