पगार अडीच लाखावर पण रक्‍तात लाचखोरी… डॉ. झकेरिया महिला कॉलेजची ग्रंथपाल एराज सिद्दीकीचा घडा भरला, छत्रपती संभाजीनगरात ACB ची मोठी कारवाई, तिघे ताब्‍यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डॉ. रफिक झकेरिया नवखंडा महिला महाविद्यालयाची ग्रंथपाल प्रा. डॉ. एराज सिद्दीकी हिला २ लाख ६७ हजार ५८८ रुपये महिना पगार आहे. गलेलठ्ठ पगार असूनही तिची पैशांची हाव मोठी… वागण्यात, बोलण्यात मुजोर… अनेक पीएच.डी. संशोधक विद्याव्यांकडून पैसे उकळले असल्याच्या तक्रारी… शेवटी तिच्या कर्माचा घडा भरलाच आणि ती आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डॉ. रफिक झकेरिया नवखंडा महिला महाविद्यालयाची ग्रंथपाल प्रा. डॉ. एराज सिद्दीकी हिला २ लाख ६७ हजार ५८८ रुपये महिना पगार आहे. गलेलठ्ठ पगार असूनही तिची पैशांची हाव मोठी… वागण्यात, बोलण्यात मुजोर… अनेक पीएच.डी. संशोधक विद्याव्यांकडून पैसे उकळले असल्याच्या तक्रारी… शेवटी तिच्या कर्माचा घडा भरलाच आणि ती आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रडारवर आली आहे. एसीबीच्या कारवाईनंतर ती फरारी झाली असून, तिच्या ३ साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. महाज्योती शिष्यवृत्तीसाठीच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी एका पीएच. डी. विद्यार्थ्याकडून तिने तब्‍बल ५ लाखांची मागणी केली होती. त्यातील ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना तिच्या मुलाला एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई जालना एसीबीने सोमवारी (१९ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरात येऊन मील कॉर्नर भागातील ईआरएस कोचिंग क्लासेसमध्ये केली.

आरोपींमध्ये ग्रंथपाल प्रा. डॉ. एराज सिद्दीकी हिच्यासह ग्रंथालय परिचारक शेख उमर शेख गणी (वय ५२), एराज हिची मुले डॉ. सिद्दीकी मो. फैसोद्दीन उर्फ समीर मो. रियाजोद्दीन आणि सिद्दीकी फराज मो. रियाजोद्दीन यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एराज सिद्दीकीची दोन्ही मुले ईआरएस रिसर्च ॲन्ड टेक्‍नोलॉजी हा कोचिंग क्‍लासेस चालवतात. सिद्दीकी फराज (वय ३१) हा संचालक तर मोठा मुलगा सिद्दीक (वय ३६) हा सहायक संचालक आहे.

ग्रंथालय व माहितीशास्‍त्र विषयात पीएच. डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्याला महात्‍मा ज्‍योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतकडून (महाज्‍योती) दरमहा ५० हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. संशोधकाचे प्रगती अहवाल, स्वयंघोषणा पत्र, हजेरी पत्रक, एचआरए प्रमाणपत्र, तिमाही, सहामाही प्रगती अहवालावर सही करण्यासाठी प्रतिमहिना १० हजार रुपये लाचेची मागणी एराज सिद्दीकीने केली होती. नोव्हेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२६ या चार वर्षांच्या कालावधीसाठी ५ लाख रुपयांत व्यवहार तिचा मुलगा डॉ. सिद्दीकी मो. फैसोद्दीन याने ठरवला. त्‍याआधी ग्रंथालय परिचारक शेख उमर यानेही डॉ. सिद्दीकी यांच्या सह्या करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

एजाज सिद्दीकीच्या लाचखोरीची तक्रार संशोधन विद्यार्थ्याने जालना एसीबीकडे केली. एसीबीने लाचेच्या मागणीची चारवेळा पडताळणी केली. पहिला ५० हजारांचा हप्ता देण्याबाबत संशोधक विद्यार्थ्याने एजाज सिद्दीकीकडे विचारणा केली असता तिने दुसरा मुलगा सिद्दीकी फराज याच्याकडे देण्यास सांगितले. संशोधक विद्यार्थी मील कॉर्नर भागातील ईआरएस कोचिंग क्लासेस येथे गेला. तिथे सिद्दीकी फराज याने ५० हजार रुपये स्वीकारले. त्‍याचवेळी एसीबीने त्‍याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर यांच्या पथकाने केली.

जवळून गेली, पथक ओळखू शकले नाही…
प्रा. डॉ. एराज सिद्दीकी हिच्याकडे ८ संशोधक विद्यार्थ्यांचा कोटा आहे. ती पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांकडून असेच पैसे उकळले असल्याचे समोर येत आहे. शिष्यवृत्ती असलेल्या संशोधकाकडून पैसे घेतल्याशिवाय सहीच करीत नाही. वागण्या, बोलण्यातही ती अत्‍यंत मुजोर आहे. एसीबीचे पथक प्रा. डॉ. एराज सिद्दीकी हिला ताब्‍यात घेण्यासाठी दुपारी साडेतीनच्या सुमारास महाविद्यालयात गेले असता पथकाच्या जवळून ती फरारी झाल्याचे समोर आले.चेहरा ओळखीचा नसल्यामुळे तिला ताब्‍यात घेता आले नाही, असे सांगण्यात आले. दरम्‍यान, या कारवाईनंतर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक आणि गंभीर आहे. विद्यापीठ प्रशासन संबंधित पीएच.डी. मार्गदर्शकाच्या विरोधात नियमानुसार कडक कारवाई करेल, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software