दोन बुरखाधारी महिलांनी जडगावकर ज्वेलर्स, आरसी बाफना ज्वेलर्सला लावला चुना!; इतक्या कडक सिक्‍युरिटीतही लांबवले दागिने!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन बुरखाधारी महिलांनी कमालच केली. कडक सिक्‍युरिटीतही दागिने लांबवण्याची किमया त्यांनी केली. उस्मानपुऱ्यातील जडगाववाला ज्वेलर्स आणि आकाशवाणी चौकातील आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. दोन्ही घटनांतील महिला एकच आहेत, की वेगळ्या हे अद्याप अस्पष्ट आहेत. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेजच्या आधारे त्‍यांचा शोध उस्मानपुरा आणि जिन्सी पोलीस घेत आहेत. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन बुरखाधारी महिलांनी कमालच केली. कडक सिक्‍युरिटीतही दागिने लांबवण्याची किमया त्यांनी केली. उस्मानपुऱ्यातील जडगाववाला ज्वेलर्स आणि आकाशवाणी चौकातील आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. दोन्ही घटनांतील महिला एकच आहेत, की वेगळ्या हे अद्याप अस्पष्ट आहेत. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेजच्या आधारे त्‍यांचा शोध उस्मानपुरा आणि जिन्सी पोलीस घेत आहेत.

उस्मानपुऱ्यातील जडगाववाला ज्वेलर्समध्ये काय घडलं…
उस्मानपुऱ्यातील जडगाववाला ज्वेलर्स दुकानात अंगठी घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी हातचलाखीने ट्रेमध्ये खोटी अंगठी ठेवून १० ग्रॅम ३८० मि.ली. वजनाची ६५ हजार २५४ रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केली. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी बुधवारी (११ सप्‍टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला. सेल्समन विशाल काहिटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता दोन बुरखाधारी महिला ग्राहक म्हणून दालनात गेल्या होत्या. त्यांनी विशाल यांच्याकडे पुरुषासाठी अंगठी दाखवण्याची मागणी केली. विशाल यांनी त्यांना विविध अंगठ्या दाखवल्या. त्यापैकी एक पसंत पडल्याचे सांगत त्यांनी किमतीबाबत विचारणा केली. विशाल वजन व किंमत काढण्यासाठी बाजूला गेले. त्यानंतर पुन्हा महिलांकडे जाऊन त्यांनी किंमतही सांगितली. मात्र, महिलांनी नंतर येतो म्हणत दालनातून काढता पाय घेतला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर २९ ऑगस्ट रोजीच्या याच महिलांनी हातचालाखीने अंगठ्याच्या ट्रे मधील खरी सोन्याची अंगठी उचलून तेथे बनावट अंगठी ठेवल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांनी भेट देत फुटज जप्त केले.

आकाशवाणी चौकातील आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये काय घडलं?
आर. सी. बाफना ज्वेलर्सचे सेल्समन सुशील सुनील जैन (वय २४, रा. सुराणानगर, सेव्हन हील) यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तो इअरिंग विभागात काम करतो. १५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजता दोन अनोळखी महिला (एकीने ग्रे बुरखा व निळा ड्रेस घातलेला व दुसरीने ब्लॅक बुरखा आणी लाल व सफेद ड्रेस घातलेला होता) दुकानात आल्या. त्यांनी कानातले आभुषणे दाखवण्यास सांगितले. सुशीलने त्यांच्यापुढे दोन ट्रेमध्ये सोन्याचे कानातले काही डिझाईन्स ठेवले.

त्यानंतर एक महिलेने वेगवेगळ्या डिझाईन दाखवण्यास सांगितल्यावरून त्याने ते दोन ट्रे खाली ड्रॉवरमध्ये ठेवले व नंतर पाच ट्रे झुमक्याचे दाखवले. ते दाखवत असताना ग्रे बुरखा घातलेल्या महिलेने पाणी मागितले. त्यांनी पाणी पिले व डिझाईन्स आवडले नाही म्हणून काही खरेदी न करता निघून गेल्या. ११ सप्टेंबरला ऑडीट करत असताना काऊंटर मॅनेजर दिलीप मोरे यांना समजले की, झुमक्यांच्या जोडीमधील एक कमी आहे. स्टाफने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता लक्षात आले की, १५ ऑगस्टला दोन महिलांनी बोलण्यात गुंतवून झुमके दाखवत असताना हातचलाखीने एक झुमका काढून घेत चोरी केला. हा झुमका ६२ हजार ५०० रुपयांचा आहे. त्याचे वजन ८ ग्रॅम १३० मि.ली. इतके आहे. पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software