…तर पोलीस वाजवतील तुमचा बॅण्ड!,सिडको MIDC पोलिसांनी केली कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्‍न समारंभात विनापरवाना बॅण्ड वाजवाल तर पोलीस तुमचा बॅण्ड वाजविण्याची शक्‍यता आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चिकलठाणा रोडवरील दौलत लॉनसमोर बेंजो बॅण्ड वाजविणाऱ्याविरुद्ध सोमवारी (१७ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करून त्‍याचे वाहन ताब्‍यात घेतले. सत्यवान बाबुराव पगारे (वय ३, संजयनगर, मुकुंदवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पोलीस अंमलदार विजय उत्तमराव तेलुरे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्‍न समारंभात विनापरवाना बॅण्ड वाजवाल तर पोलीस तुमचा बॅण्ड वाजविण्याची शक्‍यता आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चिकलठाणा रोडवरील दौलत लॉनसमोर बेंजो बॅण्ड वाजविणाऱ्याविरुद्ध सोमवारी (१७ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करून त्‍याचे वाहन ताब्‍यात घेतले. सत्यवान बाबुराव पगारे (वय ३, संजयनगर, मुकुंदवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

पोलीस अंमलदार विजय उत्तमराव तेलुरे (वय ४९) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, पोलीस अंमलदार पोळ, गवळी यांच्यासह गस्तीवर असताना सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास चिकलठाणा रोडवरील दौलत लॉनसमोर वाहनावर(क्र. एमएच २० एटी ५४३४) बेंजो बॅण्ड वाजवत असल्याचे व वाहनांवर शार्पी लाईट व फोकस चालू असल्याचे दिसले. वाद्य वाजविणाऱ्यास पोलिसांनी त्‍याच्याकडे परवान्याबाबत चौकशी केली असता त्‍याच्याकडे परवानाच नव्हता. त्‍यामुळे पोलिसांनी त्‍याचे वाहन ताब्‍यात घेऊन त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software