जय श्रीराम…घोषणा दिल्याने ४ हिंदू तरुण-तरुणींना विशिष्ट समाजाच्या तिघांनी लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारले!; तरुणीलाही सोडले नाही… बजाजनगरातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जय श्रीराम… अशी घोषणा दिल्याने ३ संतप्त धर्मांधांनी ४ हिंदूंवर हल्ला केला. लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. यात तरुणीलाही सोडले नाही. यात चौघेही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संतप्त भावना व्यक्‍त होत आहे. हल्ला केल्यानंतर तिघेही विकृत पसार झाले असून, वाळूज एमआयडीसी पोलीस त्‍यांचा शोध घेत आहेत. ही घटना बजाजनगरच्या हायटेक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जय श्रीराम… अशी घोषणा दिल्याने ३ संतप्त धर्मांधांनी ४ हिंदूंवर हल्ला केला. लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. यात तरुणीलाही सोडले नाही. यात चौघेही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संतप्त भावना व्यक्‍त होत आहे. हल्ला केल्यानंतर तिघेही विकृत पसार झाले असून, वाळूज एमआयडीसी पोलीस त्‍यांचा शोध घेत आहेत. ही घटना बजाजनगरच्या हायटेक कॉलेजसमोरील मैदानावरील मेळ्यात रविवारी (८ जून) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली.

ऋषीकेश मच्छिंद्र खेडेकर (वय २१, रा. स्वामी समर्थ चौक अयोध्यानगर बजाजनगर) या तरुणाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. बजाज ऑटो कंपनीत काम करतो. रविवारी रात्री सव्वा दहाला ऋषिकेश, मित्र यशवंत गजानन लंजे (वय २२, रा. जयभवानी चौक बजाजनगर), प्रीतम भारत जाधव (वय २२, रा. जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर), मोनिका ब्रह्मदास टेंभुर्णे (वय २२, रा. जय भवानी चौक बजाजनगर) हे चारही मित्र-मैत्रीण हायटेक कॉलेजसमोरील मैदानावर मेळा भरल्याने फिरण्यासाठी आले होते. राहट पाळण्यात बसले. पाळणा वर जात असताना खाली असलेल्या दोन- तीन व्यक्‍तींनी पाळणा वेगाने फिरव, असे पाळणाचालकाला सांगितले. त्‍यामुळे चौघेही घाबरले व पाळण्याच्या मालकाला ओरडून सांगितले, की पाळणा बंद कर. त्याने पाळणा बंद केला.

त्यानंतर चौघांनी खाली उतरताना जय श्रीराम… अशी घोषणा दिली. त्या ठिकाणी दोन- तीन विशिष्ट धर्माच्या व्‍यक्‍तींनी तुम्ही जय श्रीरामचे नारे का देत आहात, असा जाब विचारला. त्यावर ऋषिकेश त्‍यांना समजावून सांगत असताना त्यांना राग आला व त्यांनी ऋषिकेशला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यातील एकाने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने ऋषिकेशच्या डाव्या डोळ्याच्या वर मारल्याने डोके फुटले. यशवंत लंजे, प्रीतम जाधव, मोनिका टेंभुर्णे हे भांडण सोडण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही त्‍या विशिष्ट धर्माच्या दोन- तीन जणांनी संगनमत करून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुम्ही या मेळ्यातून निघून जा, नाहीतर तुम्हाला पळू पळू मारू, अशी धमकी दिली. पोलिसांनी ३ अनोळखी व्यक्‍तींविरुद्ध आज, ९ जूनला गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software