- News
- सिटी क्राईम
- छ. संभाजीनगरात महिलांच्या सेक्सुअल हर्रासमेंटच्या वाढत्या तक्रारी!; एकीला इन्स्टाग्रामवर शरीरसुखाची...
छ. संभाजीनगरात महिलांच्या सेक्सुअल हर्रासमेंटच्या वाढत्या तक्रारी!; एकीला इन्स्टाग्रामवर शरीरसुखाची मागणी, दुसरीसोबत भररस्त्यात अश्लील चाळे, आणखी दोन महिलांच्याही तक्रारी…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी वाढत आहेत. आताही चार महिलांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात एकीला इन्स्टाग्रामवर लैंगिक सुखाची मागणी करण्यात आली तर दुसरीसोबत भररस्त्यात सहकर्मचाऱ्यानेच अश्लील चाळे केले. याशिवाय आणखी दोन महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी आहेत. त्यांची कारणे वेगळी आहेत. इन्स्टाग्रामवर महिलेकडे शरीरसुखाची मागणीइन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी वाढत आहेत. आताही चार महिलांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात एकीला इन्स्टाग्रामवर लैंगिक सुखाची मागणी करण्यात आली तर दुसरीसोबत भररस्त्यात सहकर्मचाऱ्यानेच अश्लील चाळे केले. याशिवाय आणखी दोन महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी आहेत. त्यांची कारणे वेगळी आहेत.
इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज करून महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या युवकाविरुद्ध सिडको पोलिसंानी गुन्हा दाखल केला आहे. शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यास बदनामी करण्याची धमकीही युवकाने दिल्याचे तक्रारीत महिलेने म्हटले आहे. विशाल पठे (रा. मांडकी) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. तक्रार देणारी महिला आणि विशाल एकमेकांना ओळखतात. त्यांच्यातील मैत्रीतून दोघे इन्स्टाग्रामवरही बोलत होते. यातूनच त्याने तिला २० जून रोजी दुपारी अश्लील मेसेज करत शरीरसुखाची मागणी केली. महिलेने नकार दिला असता त्याने तिला धमकी देत, चार-पाच दिवसांत बघ काय करून टाकतो, तुला कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवणार नाही, असा दम भरला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने सिडको पोलीस ठाणे गाठून विशालविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीतून घरी परतणाऱ्या सहकर्मचारी महिलेचा पाठलाग करून भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना इंडो जर्मन टूल रूमजवळ २६ मे ते २८ जून दरम्यान घडली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी अभिजित जाधव (रा. नवनाथनगर, हडको) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला आणि अभिजित चिकलठाणा परिसरातील एकाच कंपनीत कामाला आहेत. गेल्या महिनाभरापासून तो तिचा पाठलाग करत आहे. कंपनीतून घरी येत असताना त्याने तिचा पाठलाग करून रस्त्यात गाठले व अश्लील चाळे केले. त्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दिली.
पतीसमोरच तिघांनी पत्नीचा विनयभंग केल्याची घटना २३ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास मिटमिटा परिसरातील हॉटेल उज्वलाजवळ घडली. या प्रकरणी आता छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम कर्डिले, डॉ. रमेश कर्डिले व आबासेट चंद्रटिके (रा. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती पती व मुलांसोबत रस्त्याच्या कडेला चहा घेत असताना श्याम कर्डिले व डॉ. रमेश कर्डिले तेथे आले. त्यांनी त्यांची मोटरसायकल न सांगता घेऊन गेले. आबासाहेब चंद्रटिके कारमध्ये आला व तिच्यासोबत गैरवर्तन करीत विनयभंग केला. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
माजी नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
गतवर्षी १६ मार्चला सिडकोतील अतिक्रमण काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादावेळी महिलेचा विनयभंग करत तिला आणि तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवकासह तीन जणांविरोधात सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक तौर (रा. एन ६ सिडको), माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी आणि नितीन खरात अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गतवर्षी १६ मार्चला झालेल्या या घटनेप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सिडको पोलिसांनी शुक्रवारी (२८ जून) महिलेची तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.

