छत्रपती संभाजीनगरात ६ विवाहितांचा छळ!; कुणाला मुलगी होत नाही तर कुणाला पसंत नाही म्‍हणून टॉर्चर; एकीवर तर तिसरे लग्न करणारा बहाद्दर घेतोय संशय!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :भरपूर सारी स्वप्न उराशी बाळगून विवाहानंतर नवीन आयुष्यात पर्दापण करणाऱ्या लेकींवर स्वार्थासाठी हपापलेल्या काही मंडळींकडून अत्‍याचार होत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरात तब्‍बल ६ विवाहितांनी पोलीस ठाण्याची पायरी चढली आहे. कुणाला मुलगी होत नाही म्‍हणून, तर कुणाला पसंत नाही म्‍हणून क्रूरपणे टॉर्चर करण्यात आले आहे. एकीसोबत तर हद्दच झाली. तिसरे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :भरपूर सारी स्वप्न उराशी बाळगून विवाहानंतर नवीन आयुष्यात पर्दापण करणाऱ्या लेकींवर स्वार्थासाठी हपापलेल्या काही मंडळींकडून अत्‍याचार होत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरात तब्‍बल ६ विवाहितांनी पोलीस ठाण्याची पायरी चढली आहे. कुणाला मुलगी होत नाही म्‍हणून, तर कुणाला पसंत नाही म्‍हणून क्रूरपणे टॉर्चर करण्यात आले आहे. एकीसोबत तर हद्दच झाली. तिसरे लग्न करणाऱ्या बहाद्दराने तिच्याच चारित्र्यावर संशय घेऊन अतोनात त्रास देणे सुरू केले… अंगाचार थरकाप उडवणाऱ्या या ६ घटना वाचा…

फ्लॅट खरेदीसाठी नर्सकडे १० लाखांची मागणी
तुझ्या आई-वडिलांकडून फ्‍लॅट खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये आण, अशी मागणी करत पती व सासरच्यांनी ३३ वर्षीय नर्सचा छळ मांडला. शिवीगाळ करून मारहाण केली. घटस्‍फोट घेण्याची धमकी दिली. नर्सने सिडको पोलीस ठाण्यात गुरुवारी (२२ ऑगस्ट) तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. वंदना सुभाष अवचार (रा. सिडको एन ६ संभाजी कॉलनी) असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत पती सुभाष, सासू रावईबाई सखाराम अवचार, नणंद राधा धरम कचरे, नंदोई धरम कचरे यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार वंदना या एमजीएम हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत.

मुलगी होत नाही म्‍हणून नांदवण्यास नकार
वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी विवाहितांच्या छळाच्या घटना आपण ऐकतो, वाचतो पण कन्‍नड शहरात वेगळीच घटना समोर आली आहे. ३१ वर्षीय विवाहितेला मुलगी होत नाही म्‍हणून सासरच्यांनी घरातून हाकलून दिले. रेणुका सूरज सुरे (रा. शनी मंदिराजवळ, वडारवाडा, कन्‍नड, ह. मु. मुकुंदवाडी रेल्‍वेगेटजवळ, छत्रपती संभाजीनगर) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यावरून पती सूरज, सासरा सुभाष मारगू सुरे, सासू सुनिता अशा तिघांविरुद्ध कन्‍नड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पती म्हणते, तू मला पसंत नाही, वैवाहिक संबंध ठेवणार नाही…
तू मला पसंत नाही, मला लग्न करायचे नव्हते. मी तुला कधीच पत्‍नीचा दर्जा देणार नाही, वैवाहिक संबंध ठेवणार नाही, असे म्‍हणत पतीने छळ मांडला. माहेरावरून प्लॉट घेण्यासाठी २५ लाख रुपये आण, अशी मागणी केली. शिवीगाळ करून मारहाण करू लागले, उपाशी ठेवू लागले. त्रास असह्य झाल्याने विवाहिता माहेरी आली. नांदवण्यास सासरच्या लोकांकडून नकार मिळत असल्याने अखेर तिने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. प्रियांका संदेश परशाद (वय ३१, रा. गोला गल्ली, हुसानीअलम रोड, हैदराबाद, ह. मु. तुळजाभवानी मंदिराजवळ गंगापूर) असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी तिचा पती संदेश, सासू चंदाकुमारी, सासरा कुंवर नारायण परशाद, नणंद श्वेता कुंवर परशाद (सर्व रा. हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आधी दोन बायका झाल्या, तिसरी बायको केली, तिच्याही चारित्र्यावर संशय…
आधी दोन लग्‍न झाले, दोन्ही बायकांना त्‍याने सोडले… नंतर तिसरी केली. तिच्यावरही संशय घेऊन तो बेदम मारहाण व शिवीगाळ करू लागला. गाडी घेण्यासाठी ७५ हजार रुपये माहेरावरून आणण्याची मागणी करू लागला. अखेर तिने पतीसह सासरच्यांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुमैय्या शाहरुख पटेल (वय २०, रा. लोणी बोडखा धामणी, ता. खुलताबाद) असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी तिचा पती शाहरुख, सासू अमीना, सासरा कय्युम भीकन पटेल, नणंद रेहाना, हिना, सुनैय्या, सानिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रिक्षा घेण्यासाठी मागितले २ लाख!
माहेरावरून रिक्षा घेण्यासाठी २ लाख रुपये आण, अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार सपना महेश साळवे (वय २३, रा. सिद्धार्थ कॉलेजजवळ, मिटमिटा) या विवाहितेने छावणी पोलीस ठाण्यात केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी तिचा पती महेश, सासू शकुंतला, सासरा माणिकराव साळवे, नणंद रेणुका, रोहिणी अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुकान टाकण्यासाठी २ लाखांची मागणी…
दुकान टाकण्यासाठी माहेरावरून २ लाख रुपये आण, या मागणीसाठी सासरच्यांनी २२ वर्षीय विवाहितेला घरातून हाकलून दिले. सबा बानो अन्वर शेख (रा. रहेमानिया कॉलनी) या विवाहितेने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी पती शेख अन्वर शेख मुक्‍तार, सासू तस्लीम बानो शेख मुक्‍तार, सासरा शेख मुक्‍ता (सर्व रा. शताब्‍दीनगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software