चहा करायला स्वयंपाक घरात गेलेल्या विवाहितेने घेतला गळफास!, पिसादेवीची धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पती आणि मुलगा हॉलमध्ये बसलेले असताना त्यांना चहा तयार करून आणते, असे सांगून स्वयंपाकघरात गेलेल्या ३७ वर्षीय कांचन देवीदास निकम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शहरातील पिसादेवी येथे मंगळवारी (२ जुलै) सायंकाळी घडली. मूळ आंबेडकर चौक परिसरात राहणाऱ्या कांचन यांचे कुटुंब सध्या पिसादेवी परिसरातील दोन खोल्यांच्या घरात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पती आणि मुलगा हॉलमध्ये बसलेले असताना त्यांना चहा तयार करून आणते, असे सांगून स्वयंपाकघरात गेलेल्या ३७ वर्षीय कांचन देवीदास निकम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शहरातील पिसादेवी येथे मंगळवारी (२ जुलै) सायंकाळी घडली.

मूळ आंबेडकर चौक परिसरात राहणाऱ्या कांचन यांचे कुटुंब सध्या पिसादेवी परिसरातील दोन खोल्यांच्या घरात राहते. त्यांचे पती फर्निचर शोरूमध्ये नोकरीला आहेत. मुलगी विवाहित आहे. मंगळवारी त्यांचे पती, मुलगा समोरील खोलीत होते. सायंकाळी त्या चहा करण्यास स्वयंपाकघरात गेल्या. तेथे त्यांनी गळफास घेतला. १०-१५ मिनिटे झाली तरी पत्नी चहा घेऊन कशी आली नाही, हे पाहण्यासाठी पती स्वयंपाकघरात गेल्यावर हा प्रकार समोर आला. त्यांनी कांचन यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. चिकलठाणा पोलीस तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software