कुटुंबासोबत चहा पिला, खोलीत जाऊन गळफास घेतला, ३५ वर्षीय युवकाच्या आत्‍महत्‍येने नारेगावमध्ये खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कुटुंबासोबत चहा घेतल्यानंतर खोलीत जाऊन ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (५ नोव्‍हेंबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास नारेगावमध्ये घडली. दीपक सुरजील शेवाळे (वय ३५) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. दीपक खासगी कामगार होता. कुटुंबासह चहा पिल्यानंतर तो दुसऱ्या मजल्यावरील त्‍याच्या खोलीत गेला. तेथे त्‍याने गळफास घेतला. त्‍याचा भाचा खेळत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कुटुंबासोबत चहा घेतल्यानंतर खोलीत जाऊन ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (५ नोव्‍हेंबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास नारेगावमध्ये घडली.

दीपक सुरजील शेवाळे (वय ३५) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. दीपक खासगी कामगार होता. कुटुंबासह चहा पिल्यानंतर तो दुसऱ्या मजल्यावरील त्‍याच्या खोलीत गेला. तेथे त्‍याने गळफास घेतला. त्‍याचा भाचा खेळत खेळत खोलीत आल्यानंतर मामाने गळफास घेतल्याचे त्‍याने पाहिले. त्‍याने ही बाब घरातील सदस्यांना सांगितल्यानंतर एकच रडारड सुरू झाली. नातेवाइकांनी दीपकला फासावरून काढून घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी, आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, अधिक तपास पोलीस अंमलदार एस. बी. पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software