कायदा सर्वांसाठी समान..मग पोलीस का असेनात…; मिनी टेम्‍पोचालकाला रस्त्यावरच बदडणाऱ्या मारकुट्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज येथील एनआरबी चौकात मिनी टेम्पोचालकाला वाहतूक शाखेच्या दोन जमादारांनी दंडात्मक कारवाईऐवजी भररस्त्यावर अक्षरशः थर्ड डिग्री दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सामान्यांत रोष पसरला होता. याची दखल घेऊन पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी वाहतूक शाखेचे हवालदार नितीन तुळशीराम व्यवहारे व सुधीर रुस्तुमराव मोरे यांना तडकाफडकी निलंबित केले होते. तेवढ्यावरच न थांबता […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज येथील एनआरबी चौकात मिनी टेम्पोचालकाला वाहतूक शाखेच्या दोन जमादारांनी दंडात्मक कारवाईऐवजी भररस्त्यावर अक्षरशः थर्ड डिग्री दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सामान्यांत रोष पसरला होता. याची दखल घेऊन पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी वाहतूक शाखेचे हवालदार नितीन तुळशीराम व्यवहारे व सुधीर रुस्तुमराव मोरे यांना तडकाफडकी निलंबित केले होते. तेवढ्यावरच न थांबता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्हिडीओची शहानिशा आणि संबंधित चालकाशी चर्चा केल्यानंतर चालकाच्या फिर्यादीवरून शनिवारी दोन्ही पोलिसांविरुद्ध गुन्हाही दाखल केला. कायदा सर्वांसाठी समान असल्याची भावना या कारवाईमुळे व्यक्‍त होत आहे.

वाळूज एमआयडीसीतून मिनी टेम्पो (एमएच २० ईएल ८७६९) हा रांजणगाव फाट्याच्या दिशेने निघाला होता. वाहनाचा चालक हलगर्जीपणाने वाहन चालवत असल्याने हवालदार नितीन व्यवहारे यांनी त्याला वाहन रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगितले. मात्र त्याने वाहन न थांबवता रांजणगाव शेणपुंजी फाट्याच्या दिशेने भरधाव निघून जाऊ लागला. व्यवहारे यांनी टेम्पोच्या मागच्या बाजूला पकडून चालकाला वाहन थांबवण्याबाबत सूचना केली.

मात्र, चालकाने वाहन उभे केले नाही, असा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सूचनांनंतरही वाहन उभे न करता पसार होण्याचा प्रयत्न चालकाने केला. त्यामुळे संतप्त दोन्ही पोलिसांनी चापटाने आणि लाकडी दांड्याने चालक अमोल महादू पवार (रा. बाबरा, ता. फुलंब्री) याला शिवीगाळ करत मारहाण केली. चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याने त्याच्याविरोधातदेखील दंडात्मक कारवाई करून वाहन वाळूज एमआयडीसी पाेलीस ठाण्यात उभे केले होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल…
टेम्पोचालकाला मारहाण करणाऱ्या वाहतूक शाखेच्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी तत्काळ निलंबित केले होते. मात्र घडलेला प्रकार गुन्हाही असल्याने सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओची शहानिशा आणि संबंधित चालकाशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्‍यानंतर चालकाच्या फिर्यादीवरून शनिवारी दोन्ही पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software