आंतरधर्मीय प्रेमविवाह; मुलीच्या वडिलांचा मुलावर खुनी हल्ला!; प्रकृती चिंताजनक, इंदिरानगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुलीला पळवून नेत प्रेमविवाह केल्याने मुलीच्या संतापलेल्या पित्‍याने जावयाच्या पोटात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्‍न केला. ही घटना रविवारी (१४ जुलै) रात्री घडली. मुलाची प्रकृती गंभीर असून, त्‍याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाचे वडील मुरलीधर बबनराव साळुंखे (वय ४६, रा. इंदिरानगर) यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात मुलीचे वडील गीताराम […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुलीला पळवून नेत प्रेमविवाह केल्याने मुलीच्या संतापलेल्या पित्‍याने जावयाच्या पोटात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्‍न केला. ही घटना रविवारी (१४ जुलै) रात्री घडली. मुलाची प्रकृती गंभीर असून, त्‍याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलाचे वडील मुरलीधर बबनराव साळुंखे (वय ४६, रा. इंदिरानगर) यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात मुलीचे वडील गीताराम भास्करराव कीर्तीशाही व नातेवाइक आप्पासाहेब अशोकराव कीर्तीशाही (रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरलीधर साळुंखे हे पत्नी छाया, मोठा मुलगा अमित, लहान मुलगा सुमित आणि सून विद्या यांच्यासह इंदिरानगरात राहतात.

२ मे २०२४ रोजी मुरलीधर यांचा मोठा मुलगा अमित (वय २५) याने शेजारी राहणारी मुलगी विद्या गीताराम कीर्तीशाही तिच्याशी प्रेमविवाह केला. त्यानंतर अमित आणि विद्या इंदिरानगरमध्येच राहायला आले. गीताराम कीर्तीशाही आणि आप्पासाहेब कीर्तीशाही हे दोघे येता जाता अमित याच्याकडे खुनशी वृत्तीने पाहत होते. रविवारी रात्री १०.१५ मिनिटांनी कुटुंबियांसोबत जेवण करून अमित फिरण्यासाठी घराबाहेर पडला असता पावणेअकराला मुरलीधर यांना अमितचा ओरडण्याचा आवाज आला.

अमित पिंपळाच्या झाडामागे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला होता. तेथूनच त्याचे सासरे गीताराम व आप्पासाहेब हे त्यांना पळताना दिसले. मुरलीधर आणि सुमित यांनी अमितला उचलून घाटी रुग्णालयात दाखल केले. अमितने वडील मुरलीधर आणि भाऊ सुमित यांना माझ्यावर गीताराम कीर्तीशाही आणि आप्पासाहेब कीर्तीशाही यांनी चाकू हल्ला केल्याचे सांगितले. अमितच्या पोट व डाव्या मांडीत चाकूचे वार खोलवर गेले आहेत. त्‍याची प्रकृती चिंताजनक आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software