- News
- सिटी क्राईम
- अतिक्रमण काढलेले साहित्य आता उचलून नेणार नाहीत, तर तिथेच चेंदामेंदा करणार!
अतिक्रमण काढलेले साहित्य आता उचलून नेणार नाहीत, तर तिथेच चेंदामेंदा करणार!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेचे पथक हे साहित्य जप्त करून नेते. ते सामान दंड भरून अतिक्रमण धारक घेऊन जायचे. त्यानंतर आता ते सामानही परत करणे बंद केले आहे. त्याही पुढे जाऊन बुधवारी (३१ जुलै) हे जप्त केलेले साहित्य तिथल्या तिथे चेंदामेंदा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. निर्णय घेण्यामागचे कारण काय?हर्सूल जलशुद्धीकरण […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेचे पथक हे साहित्य जप्त करून नेते. ते सामान दंड भरून अतिक्रमण धारक घेऊन जायचे. त्यानंतर आता ते सामानही परत करणे बंद केले आहे. त्याही पुढे जाऊन बुधवारी (३१ जुलै) हे जप्त केलेले साहित्य तिथल्या तिथे चेंदामेंदा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
हर्सूल जलशुद्धीकरण केंद्रात जप्त केलेले साहित्य इतके साचले आहे, की आता ठेवायलाही जागा उरलेली नाही. त्यामुळे आता जप्त केलेले साहित्य जागेवरच नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते साहित्य पुन्हा वापरता येणार नाही अशा रितीने त्याचा चेंदामेंदा करण्यात येईल. मग ती टपरी का असेना, तिचाही जागेवरच सोक्षमोक्ष लावला जाणार आहे. त्यामुळे लोकांनी अतिक्रमण करणाऱ्यांनी आधीच काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 18:36:27
पाचोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या युवतीला सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर प्रेमात पाडले, नंतर ४ महिने दोघे एकत्र...

