‘एनएसआयसी-मसिआ’ने घेतला उद्योजकांच्या पंखात बळ भरणारा कार्यक्रम!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (NSIC) व मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MASSIA) यांच्या संयुक्त विद्यमाने MSME Trade Enablement & Marketing (TEAM) Initiative या महत्त्वपूर्ण उपक्रमावर जनजागृती कार्यक्रम वाळूजच्या मोरे चौकातील मसिआ कार्यालयात नुकताच घेण्यात आला.

WhatsAppImage2025-10-03at5.17.22PM

कार्यक्रमाचे उद्‌घाटन मसिआचे पदाधिकारी, एनएसआयसीचे वरिष्ठ अधिकारी व उद्योजकांच्या उपस्थितीत झाले. या वेळी एनएसआयसीच्या तज्ञांनी MSME उद्योगांसाठी असलेल्या टीम उपक्रमाचे उद्दिष्ट, वैशिष्ट्ये व लाभ सविस्तरपणे स्पष्ट केले. MSME उद्योगांना विपणन व व्यापार विस्तारासाठी शासकीय सहाय्य, Open Network for Digital Commerce (ONDC) या राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, MSME उद्योगांना अनुदानाच्या स्वरूपात थेट मदत, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी MSME ला डिजिटल साधनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन आदी बाबी समजावून सांगण्यात आल्या.

एनएसआयसीचे सीनियर ब्रांच मॅनेजर अनुज कुमार शर्मा यांनी सांगितले, की ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्या माध्यमातून स्थानिक उद्योगांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. ही योजना उद्योगांना व्यवसाय वृद्धी, रोजगारनिर्मिती आणि क्षेत्रीय आर्थिक विकासासाठी नवी ऊर्जा देईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी सांगितले, की महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील उद्योगांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला पाहिजे. TEAM Initiative मुळे लघु व मध्यम उद्योगांसाठी बाजारपेठेच्या नव्या दारांचा उघडकीस होईल. मसिआ सदैव उद्योगांना योग्य मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती करून देण्यासाठी तत्पर असल्याचे गायकवाड म्हणाले.

WhatsAppImage2025-10-03at5.17.22PM1

कार्यक्रमासाठी देवाशीष जैन (मॅनेजर, SAIL नागपूर), दीपक शर्मा, (उपाध्यक्ष, YES BANK), राहुल कुमार मिश्रा (Asst. Director, MSME DFO), विकास भारती, (मॅनेजर मार्केटिंग, RAIL), अनुज कुमार शर्मा (सीनियर ब्रांच मॅनेजर, NSIC) यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित उद्योजकांना त्यांच्या मार्फत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती यावेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. कार्यक्रमाला मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील उद्योजक, HR व्यावसायिक, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, उत्पादन अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित प्रश्नोत्तर सत्रात उद्योजकांनी शंका मांडल्या व NSIC तज्‍ज्ञांनी तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी त्या समस्यांवर उद्योजकांना समाधानकारक उत्तरे दिली. अनेक उद्योजकांनी तत्काळ TEAM Initiative साठी नोंदणी करण्याची तयारी देखील दर्शवली. या वेळी NSIC चे मॅनेजर राजकुमार व प्रतीक बिसारिया यांची उपस्थिती होती.

उद्योजकांमध्ये संवाद साधून परस्पर व्यवसाय वृद्धीसाठीच्या संधींवरही चर्चा घडून आली. हा उपक्रम मराठवाड्यातील MSME उद्योगांसाठी एक नवीन दिशा आणि डिजिटल व्यापारात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची संधी निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, सह सचिव रमाकांत पुलकुंडवार, कोषाध्यक्ष सर्जेराव साळुंके, कार्यकारिणी सदस्य दुष्यंत आठवले यांच्यासह महिला विंगच्या संयोजिका सौ. सारिका किर्दक, सौ. राजश्री कुलकर्णी, सौ. रत्नप्रभा शिंदे यांच्यासह महिला विंग सदस्या तसेच  एकूण १५४ उद्योजकांची उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software