Good News : सोयीसुविधा, ग्राहक समाधानाच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात ‘टॉप’वर!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर विमानतळाने "टॉप’ स्थान मिळवले आहे. देशातील सर्व विमानतळांना मागे टाकत खजुराहो, भोपाळ आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळ यांना ५ पैकी ४.९९ रेटिंग मिळाले असून, हे तिन्ही विमानतळ पहिल्या स्थानी आले आहेत.

Aurangabad_Airport_New_Terminal

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशभरातील ६२ विमानतळांवर ग्राहक कितपत समाधानी आहेत, सोयी सुविधा कशा आहेत, याबद्दल जुलै ते डिसेंबर या कालावधीत सर्व्हे केला. यात छत्रपती संभाजीनगर विमानतळ टॉपवर राहिले. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये ४.८७ रेटिंग घेऊन १३ व्या स्थानी आलेले छत्रपती संभाजीनगर विमानतळ यंदा चक्क पहिल्या स्थानी पोहोचले. गेल्या जुलैमध्ये टॉप-१० मध्ये येत देशात ८ वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर टॉप टेनमध्ये येण्यासाठी आणखीनच प्रयत्न केल्याचे यातून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून १०० विमाने उड्डाण घेऊन शकतात. मात्र क्षमतेच पुरेपूर वापर होत नाही. कामगिरीबद्दल विमानतळाचे संचालक शरद येवले म्हणाले, की टर्मिनल इ‌मारतीतील स्वच्छतागृहांचे नूतनीकरण केले. पार्किंग क्षेत्रात ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुरुवात केली आहे. लायब्ररी, लहान मुलांसाठी चाइल्ड प्ले एरिया तयार केला असून, प्रवासी हाताळण्याची क्षमता ८०० वरून २८५० पर्यंत वाढविली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software