ॲडव्हान्टेज महा एक्स्पो : ऑरिक सिटीच्या २७ एकरांत भरणार, १५०० स्टॉल्स लागणार, देश- विदेशातील उद्योजक येणार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट) : ॲडव्हान्टेज महा एक्स्पो-२०२६ या ८ ते  ११ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या नियोजित उद्योग प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, ९ ऑक्‍टोबरला घेतला.

बैठकीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, मनपाचे अप्पर आयुक्त रणजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उद्योग सहसंचालक स्वप्निल राठोड, ऑरिक सिटीचे शैलेश धाबेकर, अरुण दुबे, कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी, प्रदर्शनाचे समन्वयक अनिल पाटील, ‘मसिआ’ व अन्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मसिआ व अन्य औद्योगिक संघटना, संस्थांच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासन, सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योग, ऑरिक सिटी, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्य सहयोगातून  ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन ऑरिक सिटी येथे ८ ते ११ जानेवारी २०२६  या कालावधीत केले जाणार आहे. या औद्योगिक प्रदर्शनात देशातील तसेच विदेशातील अनेक उद्योजक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणार आहेत. येथे सामंजस्य करार, चर्चासत्रे आदी होणार आहेत.

बैठकीत माहिती देण्यात आली की, हे प्रदर्शन ऑरिक सिटीच्या आवारात २७.५ एकर क्षेत्रात भव्य आयोजित होणार आहे. त्यात १५०० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. त्यात देश- विदेशातील उद्योजक येणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची विशेष ओळख दर्शविणारे, येथील संस्कृती, कला यांचे दर्शन घडविणारे स्टॉल्स लावले जाणार आहेत. जेणेकरून येणाऱ्या बाहेरच्या उद्योग प्रतिनिधींना त्याची ओळख होईल. त्याच प्रमाणे येथे उत्पादन, ऑटोमोबाईल, कृषी, टेक्सटाईल, फुड, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, पर्यटन, आतिथ्य उद्योग अशा विविध उद्योग क्षेत्रातील प्रदर्शने लावली जाणार आहेत. आयोजनाच्या ठिकाणी येण्या जाण्याचे मार्ग, वैद्यकीय सुविधा, रुग्ण वाहिका, अग्निशमन वाहने, इंटरनेट सुविधा, नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन सुविधा आदीबाबत प्रशासनाच्या सहयोगाने उपलब्धता करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित विभागांना निर्देशित केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software