अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ५ वर्षे सक्‍तमजुरी, हडकोतील शाळेत घडला होता प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम शिक्षकाला सत्र न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही घटना हडकोतील एका नामांकीत शाळेत घडली होती. विजय सीताराम हिवाळे (वय ५०, रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. विजय हिवाळे प्राथमिक शाळेत ५ वी अ चा वर्गशिक्षक होता. तो गणित शिकवत होता. त्याच्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळेतील सीसीटीव्ही फूटेज तपासले. ८ एप्रिल २०२३ रोजीच्या फूटेजमध्ये हिवाळे याने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छडीने मारहाण केल्याचे आणि दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे केल्याचे दिसले. ७ वीतील १३ वर्षीय विद्यार्थ्यालाही त्याने खाली पडेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार दिसून आला. मुख्याध्यापकांनी संस्थाचालकाला कळवल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानुसार १० जुलै २०२३ रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीअंती न्यायालयाने विजय हिवाळे याला दोषी ठरवून ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software