वेळकाढूपणा बंद करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, काँग्रेसची छ. संभाजीनगरात जोरदार निदर्शने

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकारकडून वेळकाढूपणा सुरू असल्याने शहर, जिल्हा काँग्रेस समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (३ ऑक्टोबर) दुपारी जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. खासदार डॉ. कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, विलास औताडे, नामदेव पवार, डॉ. जफर खान, डॉ. सरताज पठाण, सय्यद अक्रम, अशोक डोळस, भाऊसाहेब जगताप, जगन्नाथ काळे, संदीप बोरसे, डॉ. अरुण शिरसाट, दीक्षा पवार, अनिस पटेल, सूर्यकांत गरड, विठ्ठल कोरडे, राहुल सावंत, भास्कर घायवट, दिलीप भोसले, रावसाहेब नाडे, विशाल बन्सवाल, मोईन इनामदार, योगेश थोरात, जावेद पठाण, मोहसिन खान, जलील देशमुख, परवीन देशमुख, अस्मत खान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला.

अतिवृष्टीने जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्यातही दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे मदत कधी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला किमान ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी आग्रही मागणी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेसच्या आंदोलनात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचा सहभाग नव्हता.

उद्धव ठाकरेंचा ११ ऑक्‍टोबरला मोर्चा
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पंजाब राज्याच्या धर्तीवर प्रति हेक्टरी ५० हजार रुपये त्वरित द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ११ ऑक्टोबरला विभागीय आयुक्तालयावर हंबरडा मोर्चा काढणार आहेत. मोर्चा यशस्वी करण्यासाठी  ५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान शिवसेना मराठवाडा व्यापी आंदोलन करणार असून, ५ ते ७ऑक्टोबरदरम्यान ग्रामसभा व गावभेटी घेण्यात येणार आहेत, असे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software