दूध संघाकडून सभासदांची ५० पैसे बोनसवर बोळवण!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्हा दूध उत्पादक संघाने सभासदांची ५० पैसे बोनसवर बोळवण केली आहे. एक रुपया बोनसची मागणी होती, सर्व सभासद आग्रही होते. पण संचालक ऐकायला तयार नव्हते. निदान ६० पैसे तरी बोनस द्या, अशा घोषणा सुरू झाल्या. त्यानंतर ५० पैसे बोनसचा निर्णय जाहीर करून संघाचे अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत यांनी सभा आटोपती घेतली.

जिल्हा दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बीड बायपासवरील एका मंगल कार्यालयात गुरुवारी (२५ सप्टेंबर) झाली. नफा नवीन इमारत बांधकामांना न वापरता सभासदांना लाभांश स्वरुपात ६० पैशाने वाटप करावा, असा आग्रह सिल्लोडचे राहुलकुमार ताठे व वैजापूरचे नंदकिशोर जाधव यांनी धरला. अखेर ५० पैशांवर सभासदांना समाधान मानावे लागले. दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश पहाडिया यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा ठराव या वेळी घेण्यात आला.

उपाध्यक्ष दिलीप निरफळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे, संचालक नंदू काळे, पुंडलिकराव काजे, राजेंद्र जैस्वाल, संदीप बोरसे, अलका रमेश डोणगावकर, सुमित्रा चोपडे, इंदुबाई सुरडकर, दामूअण्णा नवपुते आदींची उपस्थिती होती. दूध संघ ८९ लाख ८४ हजार ६७६ रुपयांच्या नफ्यात असून, कर्मचारी पगार खर्च व इतर भत्त्यांवरचा खर्च मात्र ५ कोटी २८ लाख ८७हजार ५७२ हजार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंतचा हा नफ्याचा आकडा असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. काळेंची अनुपस्थिती...
दरवेळी संचालक मंडळावर प्रश्नांची सरबत्ती करणारे खा. डॉ. कल्याण काळे अनुपस्थित होते. अंबादास दानवे यांचे छायाचित्र वार्षिक अहवालात छापले गेले नव्हते. याद्दल काही सभासदांनी नाराजी व्यक्त केली. अहवालात ज्यांची ठळक छायाचित्रे आहेत, ते कुणीच सभेकडे फिरकले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी...
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software