- News
- जिल्हा न्यूज
- विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू, सासरच्यांवर हत्येचा आरोप करत माहेरच्यांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन,
विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू, सासरच्यांवर हत्येचा आरोप करत माहेरच्यांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन, साडेचार तास अंत्यविधी थांबले!, फुलंब्रीतील घटना
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाणेगाव (ता. फुलंब्री) येथे ३१ वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. विवाहितेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर हत्येचा आरोप करत फुलंब्री पोलीस ठाण्यासमोर मृतदेह आणला आणि सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा करून अटक करण्याची मागणी केली. साडेचार तास यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सासरच्यांना अटक केल्याचे व्हिडीओ कॉलद्वारे दाखवले. त्यानंतर विवाहितेचे नातेवाइक शांत झाले. ही घटना बुधवारी (१४ जानेवारी) घडली.
सासरच्यांना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली. या वेळी पोलिसांना दंगा काबू पथकाला पाचारण करावे लागले. सुनिताचे भाऊ गजानन गवळी (रा. मोढा खुर्द) यांनी तक्रार दिली, की जेसीबीसाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी सुनीता यांचा छळ केला जात होता. त्यावरून पोलिसांनी पती अण्णा भोकरे, सासू मनूबाई भोकरे, सासरा राजाराम भोकरे, जाऊ गंगूबाई संतोष भोकरे, नणंद भागीनाथ गायकवाड व नणंद राजू कारले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयितांना ताब्यात घेतल्याचे व्हिडीओ कॉलद्वारे दाखविले. त्यानंतरच नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले. यानंतर रात्री ११:३० वाजता वाणेगाव येथे सुनीता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

