- Marathi News
- जिल्हा न्यूज
- मोठी बातमी : छ. संभाजीनगरात २६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री अन् साठ्यात आढळली तफावत!, वाचा य...
मोठी बातमी : छ. संभाजीनगरात २६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री अन् साठ्यात आढळली तफावत!, वाचा या कृषी केंद्रांची नावे...
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कृषी सेवा केंद्रचालकांनी अनुदानित खतांची शेतकऱ्यांना विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील २६ कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली असता त्यांनी ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री केली असल्याने झालेली विक्री व साठा यात तफावत आढळली. त्यामुळे या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर प्रकाश पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजला दिली.
उत्कर्ष कृषी सेवा केंद्र दहेगाव बंगला, ता.गंगापूर, मेहराज एजन्सी दहेगाव बंगाल ता. गंगापूर, किसान एजन्सी दहेगाव बंगला ता.गंगापूर, हरी ओम कृषी सेवा केंद्र, दहेगाव बंगला ता. गंगापूर, सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस दहेगाव बंगला ता. गंगापूर, तिरुपती कृषी सेवा केंद्र, बाबरा ता. फुलंब्री, स्वराज कृषी सेवा केंद्र, ता. फुलंब्री, विश्वास ॲग्रो सर्व्हिसेस बालानगर ता. पैठण, न्यू जय भोले कृषी सेवा केंद्र, जोडवाडी ता. छत्रपती संभाजीनगर, गौरी कृपा कृषी सेवा केंद्र करमाड ता. छत्रपती संभाजीनगर, मृदा संजीवनी शेती साहित्य गांधेली ता. छत्रपती संभाजीनगर, नागेश्वर कृषी सेवा केंद्र, बाबरा ता. फुलंब्री, माऊली कृषी सेवा केंद्र देवगाव रंगारी ता. कन्नड, विशाल कृषी सेवा केंद्र, वाकोद ता. फुलंब्री, संतोष कृषी सेवा केंद्र धोंदलगाव ता. वैजापूर, श्री. सद्गुरू कृपा कृषी सेवा केंद्र बालानगर ता. पैठण, मराठवाडा कृषी सेवा केंद्र जटवाडा ता. छत्रपती संभाजीनगर, हरी ओम ट्रेडर्स जटवाडा ओव्हर ता. छत्रपती संभाजीनगर, अमृता ॲग्रो एजन्सी विहामांडवा ता. पैठण, आर. के. ॲग्रो शरणापूर ता. छत्रपती संभाजीनगर, नाथ कृषी उद्योग गारज ता.वैजापूर, ओम साई ट्रेडर्स खंडाळा ता. वैजापूर, आदर्श कृषी सेवा केंद्र, जाधववाडी ता. छत्रपती संभाजीनगर, गणेश कृषी सेवा केंद्र ता. कन्नड.
ई-पॉस प्रणालीवरून विक्री न केल्याने कृषी सेवा केंद्राच्या ई-पॉस प्रणालीवर जास्त खत साठा तसेच प्रत्यक्ष कृषी केंद्रावर कमी खत साठा अशी परिस्थिती निर्माण होते व त्याचा परिणाम जिल्ह्याच्या खत पुरवठ्याच्या मागणीवर होतो. केंद्र शासनामार्फत करण्यात येणारा खत पुरवठा ई-पॉस प्रणालीवर उपलब्ध असलेल्या खत साठ्याच्या अनुषंगाने करण्यात येतो. कृषी सेवा केंद्रांनी ई-पॉस प्रणालीवर खत उपलब्ध झाल्यानंतरच प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खतांची विक्री करावी. कृषी सेवा केंद्र यांनी ऑफलाईन पद्धतीने खताची विक्री करू नये, तसे आढळल्यास खत नियंत्रण कायदा १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिला आहे.